आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेक न्यूजवर कारवाई:जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीबाबत खोटी माहिती देणाऱ्या पत्रकार, अँकर विरोधात गृहमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशभरात कोरोना संसर्गामुळे भीतीचं वातावरण असताना घबराट पसरवणाऱ्या खोट्या बातम्या दाखवणं चुकीचं - गृहमंत्री

कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांची कन्या स्पेनमधून परत आल्यावर कोरोनव्हायरस पॉझिटिव्ह झाल्याची खोटी बातमी चालविल्याबद्दल एका न्यूज चॅनेलचे पत्रकार आणि अँकरविरूद्ध कारवाईचे आदेश दिल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. दरम्यान देशमुख यांनी संबंधित वृत्तवाहिनीचे नाव घेतले नाही. वृत्तवाहिनीने कोणत्याही कोरोनाव्हायरस-संक्रमित रुग्णाचे नाव उघड न करण्याच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले, असे गृहमंत्र्यांनी केलेल्या ट्वीट्समध्ये म्हटले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, "ज्या चॅनलने 15 एप्रिलला सकाळपासून जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीबद्दल धादांत खोटी व चुकीची बातमी चालवली गेली ज्यात ती स्पेन हून येताना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा खोटा दावा केला गेला. विशेष म्हणजे कोणत्याही कोरोना रूग्णचे नाव जाहीर न करण्याच्या आचारसंहितेची पायमल्ली केली." 

दुसऱ्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की, "कायद्यानुसार सुद्धा मुलींचं नाव जाहीर न करण्याचे नियम आहेत. गैर जबाबदारपणे बेछूट हेतूपुरस्सर या वृत्तवाहिनीने जे केलं ते अत्यंत गंभीर आहे. देशभरात कोरोना संसर्ग व प्रादुर्भावामुळे भीतीचं वातावरण असताना घबराट पसरवणाऱ्या खोट्या बातम्या दाखवणं खूपच चुकीचं आहे. त्यामुळे या बातमीची वार्ताहर व निवेदक यांच्यावर नियमानुसार कारवाईचे आदेश दिले गेलेले आहे."

जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला केले होम क्वारंटाइन

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी संबंधित एक पोलिस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. यामुळे खबरदारी म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन केले आहे. दरम्यान बुधवारी आव्हाड म्हणाले की, त्या पोलिस अधिकाऱ्याचा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला असून तो तंदरुस्त आहे. 

बातम्या आणखी आहेत...