आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्चांक:होंडा कार्सने नोंदवला 20 लाख कारच्या निर्मितीचा उच्चांक!

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

होंडा कार्स इंडियाने १९९७ पासून भारतात होंडा कार्सच्या उत्पादनांची निर्मिती सुरू केली. ‘मेक इन इंडिया’च्या अंतर्गत होंडा कार्सने आता तब्बल २० लाख कारची निर्मिती करून भारतीय कार उत्पादनातील एक नवा उच्चांक स्थापित केला. भारतातील तापुकारा प्लँटमध्ये २० लाख कार निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. भारतीय ग्राहकांना आपल्या कारद्वारे प्रीमियम आणि जागतिक दर्जाची उत्पादने देण्यामध्ये होंडा कार्स ही भारतीय बाजारपेठेतील एक अग्रगण्य कार उत्पादक कंपनी ठरलेली आहे. सुरक्षितता, आरामदायीपणा, आधुनिकता, तंत्रज्ञान अशा विविध निकषांवर होंडा कार्सने भारतीय बाजारपेठेमध्ये विक्रीचाही उच्चांक यापूर्वीच नोंदवलेला आहे. भारतीयांचा हा वाढता कल लक्षात घेऊन होंडा कार्सने उत्पादनावर भर देत भारतीयांना त्यांची आवडती कार उपलब्ध करून दिली. ग्राहकांच्या याच प्रेमाच्या बळावर होंडा कार यापुढेही उत्पादन व विक्रीमध्ये अग्रेसर राहील आणि भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यात आपले योगदान देत राहील, अशी भावना होंडा कार्सचे अध्यक्ष आणि सीईओ ताकियो त्सुमारा यांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...