आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादैनिक भास्करचे नॅशनल एडिटर ओम गौड यांना ‘जर्नलिस्ट ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. हा सन्मान ‘रेड इंक अवाॅर्ड्स २०२२ फॉर एक्सलन्स इन जर्नलिझम’ या सोहळ्यात निवृत्त न्यायाधीश बी. एन. श्रीकृष्णा यांनी प्रदान केला. माजी संपादक तथा स्तंभलेखक टी. जे. एस. जॉर्ज यांना ‘लाइफटाइम अचीव्हमेंट’ अवॉर्डने सन्मानित केले. सोहळा मुंबईत झाला.
सोहळ्यात मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबीरसिंह दैनिक भास्करच्या निर्भीड पत्रकारितेचे कौतुक करत म्हणाले, ‘कोरोनाकाळ व त्यानंतरही भास्कर समूहाने बेधडक पत्रकारिता केली.’ हा पुरस्कार आपल्या संपादकीय टीमला समर्पित करत गौड म्हणाले, ‘सच को सच और गलत को गलत कहो’ या तत्त्वामुळेच भास्करची विश्वासार्हता वाढत आहे. रेड इंक पुरस्कारांसाठी पॉलिटिक्स श्रेणीत दिव्य मराठीच्या दीप्ती राऊत व महेश जोशी तसेच राजस्थान दैनिक भास्करचे अनिल शर्मा यांनाही नामांकन मिळाले हाेते.
प्रिंट इनोव्हेशनसाठी वॅन इफ्रा पुरस्कारही दैनिक भास्करने ‘प्रॉडक्ट इनोव्हेशन’ श्रेणीमध्येही वॅन इफ्रा पुरस्कार जिंकला आहे. हा पुरस्कार दैनिक भास्करच्या सूरत आवृत्तीत डिजिटल प्रिंटिंगचा वापर करत गज्जी सिल्क कापडावर ४ कलर फ्रंट पेज जॅकेटसाठी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.