आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maharashtra Corona Treatment। Corona Treatment Rates In Maharashtra, State Government, Corona Treatment Rates In Aurangabad, Nagpur, Mumbai, Pune, Nanded, Nashik

महाराष्ट्रात कोरोना उपचार स्वस्त:खबरदार! राज्यात शहरांची A, B आणि C अशी वर्गवारी करून दर निश्चित! रुग्णाला दाखल करून घेतानाच द्यावे लागेल प्रोव्हिजनल बिल

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अधिसूचनेस मंजुरी, काटेकोर अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा ग्रामीण भागाला बसला आहे. कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा प्रचंड खर्च थांबवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबतच्या अधिसूचनेला मंजुरी दिली आहे. यानुसार आता शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले आहेत. यात निश्चित दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत. या अधिसूचनेची काटेकोर आणि परिणामकारक अंमलबजावणी व्हावी याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना निर्देश देण्यात यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

असे असतील दर : मोठ्या चाचण्या, औषधी वगळली
अ वर्ग शहरांसाठी ४,००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ३,००० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी २,४०० रुपये. यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च व जेवण यांचा समावेश. कोविड चाचणीचा खर्च निश्चित केलेल्या दराप्रमाणे द्यावा लागेल. केवळ मोठ्या चाचण्या व तपासणी, तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधी यातून वगळली आहेत.

व्हेंटिलेटरसह आयसीयू व विलगीकरण
अ वर्ग शहरांसाठी ९००० रु., ब वर्ग शहरांसाठी ६७०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ५४०० रुपये.

केवळ आयसीयू व विलगीकरण

{ अ वर्ग शहरांसाठी ७५०० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ५५०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ४५०० रुपये { अ वर्ग शहरांत मुंबई तसेच महानगर क्षेत्र ( भिवंडी , वसई-विरार वगळून), पुणे तसेच पुणे महानगर क्षेत्र, नागपूर ( नागपूर मनपा, दिगडोह, वाडी), { ब वर्ग शहरांत नाशिक, औरंगाबाद, अमरावती, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली तसेच सर्व जिल्हा मुख्यालये { क गटात अ आणि ब गटाव्यतिरिक्त इतर शहरे.

दाखल करतानाच प्रोव्हिजनल बिल देणे बंधनकारक
राज्य आरोग्य हमी सोसायचीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले, की कोरोना संक्रमित रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेताना एक प्रोव्हिजनल बिल देणे बंधनकारक आहे. यासोबतच, एखाद्या रुग्णालयाने जास्त पैसे वसूल केल्यास त्यांच्या विरुद्ध फ्लाइंग स्कॉट तपास करणार आणि संबंधित रुग्णालयावर कारवाई करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...