आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरीश महाजन‎ यांचे आश्‍वासन:राज्यभरातील निवासी डॉक्टरांसाठी‎ वसतिगृह बांधणार

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवासी डॉक्टरांची सोय व्हावी यासाठी‎ वसतिगृह बांधणे आणि जुन्या वसतिगृहांची डागडुजी‎ करण्यात येणार आहे. यासाठी १४६ कोटी रुपयांचा‎ निधी प्राप्त झाला असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण‎ मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली.‎ राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विविध प्रलंबित‎ मागण्यांबाबत सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी प्रश्न‎ उपस्थित केला होता. महाजन म्हणाले, निवासी‎ डॉक्टरांसाठी असलेल्या १० हजार खोल्या अपुऱ्या‎ पडत असून, पदवी तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी‎ नव्याने खोल्या बांधण्यात येणार आहेत, असेही‎ महाजन यांनी या वेळी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...