आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिलासा:राज्यात हाॅटेल्स, रेस्तराँ, लाॅज, गेस्ट हाऊस उद्यापासून उघडणार; बिल डिजिटल पद्धतीने करणे अनिवार्य 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्षमतेच्या 33% सेवेची मुभा; सिनेमागृहे, माॅल्स, शैक्षणिक संस्था बंदच

कोरोनामुळे साडेतीन महिने बंद असलेली राज्यभरातील दीड लाख हॉटेल्स, रेस्तराँ, गेस्ट हाऊस व लॉजेस ८ जुलैपासून उघडणार आहेत. महापालिका क्षेत्रांत मात्र कंटेनमेंट झोनबाहेरील हॉटेल्स व लाॅजेसनाच परवानगी असेल. 

मिशन बिगिन अगेनअंतर्गत ठाकरे सरकारकडून सोमवारी हा निर्णय जाहीर झाला. हाॅटेल, लाॅज व गेस्ट हाऊस सुरू करण्यासाठी एक कार्यपद्धती (एसओपी) तयार केली आहे. त्यानुसार या सेवांना क्षमतेच्या ३३ टक्केच काम करता येईल. उर्वरित ६७% क्षमता गरज भासल्यास स्थानिक प्रशासनाला काेरोना रुग्णांच्या विलगीकरणासाठी वापरण्यास द्यावी लागेल. एसटी, सिनेमागृहे, माॅल्स, शैक्षणिक संस्था, लोकल, मेट्रो बंदच राहणार आहेत.

हॉटेल, रेस्तराँसाठी या आहेत अटी

१. हॉटेलच्या क्षमतेनुसार ३३% ग्राहकांना सेवा मिळेल.  

२. रेस्तराँत फक्त राहण्याची मुभा असेल.

३. ग्राहकांचे थर्मल स्क्रीनिंग करणे आवश्यक असेल.

४. सॅनिटायझर व मास्कचा वापर सक्तीचा असेल.

५. हॉटेल्समधील गेमिंग झोन, स्विमिंग पूल व जिम बंद राहणार आहे.

६. रिसेप्शनवर प्रवास हिस्ट्री नोंदवावी लागेल.

७. प्रवाशांकडे आरोग्य सेतू अॅप हवे.

८. मोठे मेळावे घेता येणार नाहीत.

९. अभ्यागताने खोली सोडल्यानंतर ती निर्जंतुक केली पाहिजे.

१०. लाॅबीत व इतरत्र पायाने हाताळता येणारे सॅनिटायझर ठेवावे. 

बिल डिजिटल पद्धतीने करणे अनिवार्य 

बिल डिजिटल पद्धतीने देणे सक्तीचे. लाॅजमधील कर्मचाऱ्यांनी ग्लोव्हज, फेस शिल्ड वापरावे. कमाल १५ लोकांना बैठक घेता येईल. एखादा अभ्यागत आजारी दिसल्यास प्रशासनाला कळवावे. हाॅटेलमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगयुक्त बैठक व्यवस्था करावी. एकदा वापरता येतील असे पेपर नॅपकिन ग्राहकांना पुरवावेत.

0