आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राणेंचा सवाल:या विश्वासघाती सरकारवर कसा विश्वास ठेवायचा जनतेने? महाड इमारत दुर्घटनेनंतर नितेश राणेंची टीका

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये भीषण इमारत दुर्घटना घडली. 5 मजली इमारत सोमवारी रात्री कोसळली. येथे रात्रीपासून बचाव कार्य अजुनही सुरू आहे. दरम्यान आता आमदार नितेश राणे यांनी सरकारवर टीकास्त्र साधले आहे.

या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत आठ जणांना वाचवण्यात यश आलं आहे तर यामध्ये आतापर्यंत तीन जणांचा बळी गेला आहे. सरकारने या दुर्घटनेतील पीडितांच्या कटुंबीयांना मदत जाहीर केली. यानंतर आता नितेश राणे यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहे. या विश्वासघाती सरकारवर विश्वास तरी कसा ठेवायचा असा सवाल त्यांनी विचरला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी रायगडमध्ये निसर्ग चक्रिवादळाने थैमान घालत नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान केले होते. याचा दाखला देत रायगडला अजुन निसर्ग वादळची पुर्ण नुकसान भरपाई मिळाली नाही. आता कालच्या इमारतीच्या मदतीची घोषणा या सरकारने केली आहे. या विश्वासघाती सरकार वर कसा विश्वास ठेवायचा जनतेने ? असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.

रायगड येथील महाड शहरातील काजलपुरा खारखांड मोहल्ला येथील तारीक गार्डन ही इमारत रात्रीच्या सुमारास कोसळली. इमारत कोसळताना मोठा आवाज झाला आणि क्षणात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ही इमारत कोसळली. यानंतर एकच आरडा ओरडा आणि आक्रोश सुरू झाला. नंतर काहींनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ मदत मिळावी, म्हणून नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मदतीसाठी धाव घेतली. यानंतर सरकारने पीडितांना मदतीची घोषणा केली आहे. अद्याप 18 जण या ठिगाऱ्याखाली अडकलेले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर जवळपास तीन जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser