आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया:तुम्ही शेतकऱ्यांना दहशतवादी-खलिस्तानी कसे म्हणू शकता? शिवसेना खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारला सवाल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांकडे जाऊन चर्चा केली पाहिजे, राऊत यांचा सल्ला

कृषी कायद्यांविरोधात दिल्ली- हरियाणा सीमा म्हणजे सिंघू व टिकरी सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. शेतकऱ्यांना दहशतवादी कसे म्हणू शकता? असा राऊत यांनी सरकारला विचारला आहे. तसेच शेतकऱ्यांवर झालेला बळाचा वापर चीनविरोधात करावा असेही राऊत म्हणाले.

या शेतकऱ्यांमुळे तुम्ही सत्तेत आला आहात

केंद्रातील कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून पंजाब-हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. त्यांना हरियाणाच्या सीमेवर अडवून त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी या शेतकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला घेरले आहे. "तुम्ही शेतकऱ्यांना दहशतवादी, खलिस्तानी म्हणून त्यांचा अपमान करत आहात. या शेतकऱ्यांमुळे तुम्ही सत्तेत आला आहात असा घणाघात राऊत यांनी भाजप सरकारवर केला आहे.

शेतऱ्यांवरील बळाचा वापर चीनविरोधात करावा

संजय राऊत म्हणाले की, "देश सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी पंजाबचा शेतकरी कष्ट करत असतो. लाखो कोटी शेतकरी शांततेने आंदोलन करत आहेत. अशाप्रकारचे आंदोलन देशाच्या इतिहासात झाले नसेल. तसेच शेतकऱ्यांवर होत असलेला बळाचा वापर चीनविरोधात करावा, असेही राऊत म्हणाले.

सरदार पटेलांची मूर्तीही रडत असेल

सरदार पटेल हे शेतकऱ्यांचे नेते होते. ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी केलेली साराबंदी चळवळ, बार्डोलीचा सत्याग्रह निर्णायक ठरला, शेतकऱ्यांचे आंदोलन उभे करून त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीस जेरीस आणले, पण दिल्लीच्या सीमेवर आणि देशाच्या सीमेवर सध्या जो अंदाधुंद प्रकार सुरू आहे, त्यामुळे पोलादी पुरुषाच्या पुतळ्याच्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्या असतील. असा टोला राऊत यांनी लगावला. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांकडे जाऊन चर्चा केली पाहिजे, असा सल्लाही राऊत यांनी सरकारला दिला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser