आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • How Did Varsha Raut, Who Was Far From The Limelight, Come Under ED's Radar? A Teacher In A School In Bhandup, Interested In Film Production, In Trouble Because Of His Girlfriend!

वर्षा राऊत कशा आल्या ईडीच्या रडारवर?:भांडुपमधील शाळेत शिक्षिका, चित्रपट निर्मितीत रस; मैत्रिणीमुळे अडचणीत!

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज ईडीकडून चौकशी सुरू आहे. पत्राचाळ घोटाळा तसेच अलिबागमधील जमीन खरेदी प्रकरणातील व्यवहार वर्षा राऊत यांच्या नावावर झाले असल्याचा आरोप ईडीने केला आहे. राजकीय झगमगाटापासून दूर असलेल्या वर्षा या मुंबईतील भांडुपमधील एका शाळेत शिक्षिका आहेत.

वर्षा राऊत यांना चित्रपट निर्मितीमध्येही त्यांना रस आहे. नेहमीच माध्यमांमध्ये प्रसिद्ध असलेल्या संजय राऊत यांच्या तुलनेत वर्षा या प्रसिद्धीपासून कोसो दूर असतात. मात्र, आता पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांनाही रडारवर घेतले आहे. या स्पेशल रिपोर्टमधून जाणून घेऊया वर्षा राऊत यांच्याविषयी सविस्तर माहिती.

वर्षा राऊत आणि संजय राऊत.
वर्षा राऊत आणि संजय राऊत.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने काही दिवसांपूर्वी पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक केली आहे. आता या सगळ्या प्रकरणात त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडीने समन्स बजावले आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या सोबत त्यांच्या पत्नींच्या अडचणीत देखील वाढ होणार आहे. आठ ऑगस्टपर्यंत संजय राऊत यांना न्यायालयाने ईडी कोठडी सुनावली आहे. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप ईडीने केला आहे.

व्यवसायाने आहेत शिक्षिका

वर्षा राऊत पेशाने शिक्षिका आहेत.
वर्षा राऊत पेशाने शिक्षिका आहेत.

वर्षा राऊत या व्यवसायाने शिक्षिका आहेत. वर्षा आणि संजय राऊत यांना पूर्वांशी आणि विदिता या मुली आहेत. भांडुपमधील एका शाळेशी त्या संलग्न आहेत. वर्षा राऊत 2020 च्या कॉर्पोरेट मंत्रालयाच्या रेकॉर्डमधील तीन कंपन्यांमध्ये भागीदार होत्या. ज्यामध्ये रॉयटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, सनातन मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सिद्धांत सिस्कॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे. यात वर्षा यांच्यासह रॉयटर्स एंटरटेनमेंट एलएलपी कंपनीत संजय राऊत, मुली पूर्वांशी आणि विदिता भागीदार आहेत. याच कंपनीने 2019 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ठाकरे चित्रपटाची निर्मिती केली होती.

मैत्रिणीने आणले अडचणीत

वर्षा राऊत यांची मैत्रीण माधुरी राऊत.
वर्षा राऊत यांची मैत्रीण माधुरी राऊत.

माधुरी प्रवीण राऊत आणि वर्षा राऊत चांगल्या मैत्रिणी आहेत. माधुरी यांचे पती प्रवीण राऊत यांचे गुरू आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळीच्या पुनर्विकासाचे काम म्हाडाकडून मिळाले होते. त्यांची कंपनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन ही हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (HDIL) ची उपकंपनी आहे. ज्यामध्ये सारंग आणि राकेश वाधवन हे प्रवर्तक आहेत. या लोकांवर पीएमसी बँकेची 6500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पीएमसी बँक घोटाळ्याच्या चौकशीचे प्रकरण उघड झाले. तेव्हा माधुरी राऊत आणि वर्षा संजय राऊत यांच्यातील हा व्यवहार उघड झाला.

वर्षा राऊत कशा आल्या चर्चेत?

वर्षा राऊत यांचे नाव पहिल्यांदाच पत्रा चाळ जमीन घोटाळ्यामुळे चर्चेत आहे. 2020 मध्ये महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात पीएमसी बँक घोटाळा समोर आला होता. त्यानंतर पत्राचाळ घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत याची पत्नी माधुरी हिच्या बँक खात्यातून वर्षा राऊत यांच्या खात्यात 55 लाख रुपये ट्रान्सफर झाल्याची माहिती मिळाली. ईडीची टीम आता हा व्यवहार का करण्यात आला याचा तपास करत आहे. या पैशातून संजय राऊत यांनी दादरमध्ये फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

इतके सोने, चांदी, जमिनी

वर्षा राऊत यांच्याकडे 729.30 ग्रॅम सोने आणि 39,59,500 रुपये किमतीचे दागिने आणि दीड लाख रुपये किमतीची1820 ग्रॅम चांदी आहे. त्यांच्याकडे 2004 मध्ये खरेदी केलेली कार आणि दोन रिव्हॉल्व्हर आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षात त्यांची कमाई 21,58,970 होती. त्यांच्याकडे पालघरमध्ये 2014 मध्ये खरेदी केलेला 0.73 एकरचा भूखंड आहे. भूखंडाची सध्याची किंमत सुमारे 9 लाख रुपये आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे आठ जमिनी आहेत. राऊत यांची दादर, भांडुप आणि आरे मिल्क कॉलनीमध्ये तीन घरे आहेत. त्यांच्या पत्नीचे दादर येथे घर आहे. चार मालमत्तांची किंमत अंदाजे 6.67 कोटी रुपये आहे. त्यांची मुंबईत 5.05 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

काय आहे पत्राचाळ प्रकरण?

मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रवीण राऊतांची गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांचे पत्राचाळ पुनर्विकासाचे म्हाडासोबत कंत्राट झाले. त्यांनी म्हाडा, भाडेकरूंसाठी फ्लॅट न बांधताच गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने 9 विकासकांना 901 कोटी रुपयांना एफएसआय विकला. पत्राचाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रवीण राऊत यांच्यावर आरोप आहे.

गुरू आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळचे 3 हजार फ्लॅट बांधायचे होते. त्यापैकी 672 फ्लॅट भाडेकरुंना द्यायचे होते. तर उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घेण्यात येणार होते. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. फ्लॅट विकण्याच्या नावाखाली 138 कोटी जमा केले. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली.

कन्या पूर्वांशीचा शाही विवाहसोहळा

वर्षा राऊत, संजय राऊत मुलगी पूर्वांशी आणि विदितासोबत.
वर्षा राऊत, संजय राऊत मुलगी पूर्वांशी आणि विदितासोबत.

संजय राऊत आणि वर्षा राऊत यांची कन्या पूर्वांशी राऊतचा विवाह सोहळा 29 नोव्हेंबरला मुंबईत पार पडला. पूर्वांशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार आज लग्नबंधनात अडकले. या लग्नसोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी हजेरी लावली.

हा विवाह सोहळा पवईच्या हॉटेल रेंनीसांसमध्ये झाला. यावेळी संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. संजय राऊत यांच्या मुलीच्या संगीत कार्यक्रमात राऊत आणि सुळे यांनी डान्स केला होता. या डान्सदरम्यान सुप्रिया सुळेंनी वर्षा राऊत यांनाही बोलावले होते. या लग्नसोहळ्यात राऊतांनी मोठा खर्च केल्याचे दिसून आले.

कन्या पूर्वांशीच्या विवाहसोहळ्याप्रसंगी.
कन्या पूर्वांशीच्या विवाहसोहळ्याप्रसंगी.
बातम्या आणखी आहेत...