आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअडीच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी किती जणांच्या चुली पेटवल्या हे सांगावे. तुम्ही चुली पेटवणारे नसून चुली उद््ध्वस्त करणारे आहात. तुम्ही मराठी तरुणाच्या हातात दगड दिले आहेत, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सोमवारी (ता. १६) केली. उद्धव यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणण्याची लाज वाटते, असा टोलाही त्यांनी लगावला. दिशा सालियन आणि सुशांतसिंह यांना यांनीच ठार मारले आहे, याचा पुनरुच्चार राणे यांनी केला.
राणे यांनी सोमवारी भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी राणे यांनी शिवसेनेचे मुखपत्र हातात घेऊन उद्धव यांच्यावर टीकास्त्र सोडले. उद्धव जी अजून १० वर्षे जरी मुख्यमंत्री असलात तरी नारायण राणेंनी आठ महिन्यात केलेल्या कामाची बरोबरी होऊ शकणार नाही. चेष्टा, विनोद करणे सोपे, पण काम करणे अवघड असते. शिवसेनेची परवाची सभा शिव संपर्क अभियान नव्हती ते शिव्यासंपर्क भाषण होते. या सभेत सेनेने फेरीवाले आणून बसवले होते. त्यांचा शिवसेनेशी संबध काय,” असा सवाल राणे यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमची तुम्हांला विनंती आहे की, तुम्ही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरा विषयी टीका करू नये. तुम्ही प्रथम आरशात स्वत: चा चेहरा पाहावा, मग बोलायचा विचार करावा. मी आधी शिवसेनेत होतो, आता भाजपमध्ये आहे. त्यामुळे बोलायला जराही घाबरणार नाही. पुढच्या वेळी अजून पुढचे बोलेल, असा इशारा राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
ना मंत्रालय, ना अधिवेशन असा कसा मुख्यमंत्री ?
२५ वर्षे युती करायची व नंतर मग मुख्यमंत्री पदासाठी गद्दारी करायची, अशी शिवसेनेची पद्धत आहे. अडीच वर्षे या सरकारने कोणतेही काम केले नाही. ना मंत्रालय, ना कॅबिनेट, ना अधिवेशन. असला कसला मुख्यमंत्री असतो. काही पुळचट माणसे आहेत, त्यामुळे शिवसेनेची दुर्दशा आहे, असा आरोप राणे यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.