आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र सरकारने दिलेल्या भूखंडांवर उत्तर प्रदेश सरकारने मुंबई भागात यूपी भवन आणि उत्तर भारतीय भवन उभारले आहे. तिसऱ्या भवनाची पायाभरणी झाली आहे. महाराष्ट्राने एवढ्या सढळ हस्ते मदत करूनही उत्तर प्रदेशात मात्र योगी सरकार अयोध्या आणि काशीमध्ये भक्त निवासासाठी महाराष्ट्राला जमीन देण्यास टाळाटाळ करत आहे. यासंदर्भात विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी स्वतः मुख्यमंत्री कार्यालयामार्फत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही यासाठी आग्रही मागणी केली. मात्र, या मागणीवर अद्याप कोणतेही सकारात्मक उत्तर आले नाही.
उत्तर भारतीयांसाठी राज्य सरकारची सढळ हस्ते मदत
महाराष्ट्रामध्ये तीन ठिकाणी उत्तर भारतीयांसाठी राज्य सरकारच्या वतीने अत्यंत स्वस्त दरात जमिनी देण्यात आल्या. एवढे असूनही महाराष्ट्राला भक्त निवास उभारण्यासाठी उत्तर प्रदेशात अजून जागा मिळालेली नाही.
1. वाशीमध्ये सिडकोच्या भूखंडावर उत्तर प्रदेश सरकारने भव्य यूपी भवन बांधले आहे.
2. बीकेसीपासून अगदी जवळ राज्य सरकारच्या जमिनीवर यूपी भवन उभारण्यात आले.
3. मीरा-भाईंदर परिसरात हिंदी भाषा भवनासाठी स्थानिक
संस्थेने नुकतीच जमीन ताब्यात घेतली आहे. त्याचे भूमिपूजन गेल्या रविवारी उत्तर प्रदेशचे मंत्री स्वतंत्र देव सिंह यांनी केले.
जमीन निश्चित मिळेल - नार्वेकर :
महाराष्ट्राला भक्त निवाससाठी जमीन देण्यास विलंब करत आहे, असे नव्हे. अशा कामांना थोडा वेळ लागत असतो. तसेच उत्तर प्रदेश सरकारला लिहिलेल्या पत्राचे अद्याप उत्तर आले नसल्याचे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी सांगितले.
पत्राला उत्तरही नाही हे दुर्दैवी : सचिन अहिर
महाराष्ट्राने यूपीलाच नाही तर इतर राज्यांनाही नवी मुंबई व शिर्डीत जमिनी दिल्या. अयोध्येसह उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांना महाराष्ट्रातील लोक मोठ्या संख्येने भेट देतात. उत्तर प्रदेश सरकारने महाराष्ट्र िवधानसभा अध्यक्षांच्या पत्राला साधे उत्तरही न देणे दुर्दैवी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते (उद्धव ठाकरे गट) सचिन अहिर
यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.