आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीचा निकाल उद्या:HSC बारावी निकाल उद्या संध्याकाळी 4 वाजता; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती, येथून पाहता येणार निकाल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

HSC बोर्डाच्या 12 वीचा निकाल उद्या सायंकाळी 4 वाजता जाहीर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून सोमवारी ही माहिती जारी केली. http://mh-hsc.ac.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना आपला आसन क्रमांक टाकून निकाल पाहता येणार आहे.

कोरोना आणि लॉकडाउनमुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षांसह जवळपास सर्वच परीक्षा रद्द करण्यात आल्या. यावर्षीचा बारावीचा निकाल परीक्षा न घेता मूल्यमापन पद्धतीवर जारी केले जाणार आहेत. यामध्ये दहावी, अकरावीचे मार्क आणि बारावीतील अंतर्गत परीक्षांचे गुण यांचा विचार केला जाणार आहे.

शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांचा बारावीचा निकाल 3 ऑगस्ट रोजी जारी केला जाणार आहे. हा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार, अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवारी सायंकाळी 4 वाजता पाहता येणार आहे.

शिक्षणमंत्र्यांनी ट्विटरवरुन दिली माहिती
12 वी बोर्डाच्या निकाला संदर्भांत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे.

या ठिकाणी पाहता येईल निकाल
1. https://hscresult.11 thadmission.org.in

2. https://msbshse.co.in

3. hscresult.mkcl.org

4. mahresult.nic.in.

बातम्या आणखी आहेत...