आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शैक्षणिक:15 ते 20 जुलैदरम्यान बारावी, दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची हिंगोलीत माहिती

हिंगोली/मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अकरावीत प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू

राज्यात बारावीचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान, तर दहावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दिली.

लॉकडाऊनमुळे दहावी-बारावीचे पेपर तपासण्यास विलंब झाला. त्यामुळे निकालही लांबणीवर पडला. यातच सोशल मीडियावर निकालाच्या तारखेसंदर्भात वेगवेग‌‌ळे दावे करण्यात येत होते. त्याला हिंगोलीत पत्रकार परिषदेत गायकवाड यांनी विराम दिला. कोरोनामुळे २३ मार्च रोजी होणार दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला. अन्य विषयांच्या सरासरी गुणांच्या आधारावर या विषयाचे गुण दिले जाणार असल्याचे आधीच जाहीर करण्यात आलेले आहे.

अकरावीत प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू

या वर्षी बारावीच्या १३ लाखांहून अधिक, तर दहावीच्या १७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. दुसरीकडे ११ वीच्या प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. १५ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार असून निकाल लागल्यानंतर महाविद्यालय निवड प्रक्रिया करता येणार आहे.

0