आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेट:दहा टी-२० सामने खेळणारेही मुख्य करारासाठी ठरतील पात्र, टी-२० च्या लाेकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ; बीसीसीअायने घेतला नवा निर्णय

मुंबई/अॅडिलेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या २७ पुरुष खेळाडूंशी करार केला; यंदा हाेणार वाढ

टी-२० या झटपट फाॅरमॅटने अाता क्रिकेटच्या प्रेमींमध्ये माेठ्या संख्येत वाढ झाली अाहे. या फाॅरमॅटचा चाहता वर्गही झपाट्याने वाढत अाहे. त्यामुळे टी-२० च्या भारतातील अाणि विदेशातील लीग तुफान लाेकप्रिय हाेत अाहेत. यामध्ये खासकरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून अायाेजित करण्यात येणाऱ्या अायपीएलचा महत्त्वाची भूमिका अाहे. याच लीगमुळे टी-२० चा फाॅरमॅट लाेकप्रियेतेच्या शिखरावर अाहे. याने मर्यादित षटकांच्या वनडे अाणि कसाेटीसारख्या फाॅरमॅटलाही मागे टाकले अाहे. ही बाब अाता लक्षात घेऊन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याच फाॅरमॅटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी माेहीम हाती घेतली. यासाठी बीसीसीआयने मुख्य करारातील नियमात बदल केले. आता केवळ दहा टी-२० सामने खेळणाऱ्या खेळाडूलादेखील मुख्य करार मिळू शकतो. टी-२० प्रकारच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे मंडळाने हा निर्णय घेतला.

मंडळाकडून पुरुष खेळाडूंची चार गटात अ+, अ, ब व क मध्ये करार केला जातो. अ+ करार करणाऱ्यांना वर्षाला ७ कोटी रुपये मिळतात. अ गटात ५ कोटी, ब गटात ३ कोटी आणि क गटात वर्षाला १ कोटी रुपये दिले जातात. सर्वोच्च न्यायालयाकडून स्थापन केलेल्या कमिटी ऑफ अॅडमिनिस्ट्रेटर्स (सीओए) चा तो प्रस्ताव मंडळाने रद्द केला होेता. ज्यामध्ये टी-२० चा समावेश करण्याबाबत म्हटले होते. मात्र, नियमात बदल करत तीन कसोटी किंवा ७ वनडे खेळणाऱ्या खेळाडूला करारबद्ध करण्याचा निर्णय घेतला होता. गत सत्रात मंडळाने अपवादात्मक रूपात फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला करारबद्ध केले होते. मंडळाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, या छोट्या प्रकारातील क्रिकेटमधील खेळाडूंना करार दिला जाऊ शकतो. सध्या मंडळाकडून १७ पुरुष खेळाडूंना करारबद्ध केले आहे.

आफ्रिकेत आजपासून लॉकडाऊन बंद, पहिली कसोटी अॅडिलेडमध्ये
अॅडिलेडमध्ये १७ डिसेंबरपासून भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान पहिला दिवस-रात्र सामना खेळवला जाईल. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता येथील आयोजनावर शंका होती. मात्र, आता शनिवारी लॉकडाऊन समाप्त होत आहे आणि नियमातही सूट दिली जात आहे. अशात कसोटी सामना या ठिकाणी होण्याची शक्यता वाढली. मेलबर्न व सिडनीला राखीव म्हणून ठेवण्यात आले आहे. मात्र, अाता येथील परिस्थितीही पूर्णपणे अाटाेक्यात अालेली अाहे. यातून येथे कसाेटी सामना अायाेजित करण्याचा मार्गही माेकळा झालेला अाहे. याशिवाय येथील सरकारनेही काेराेनासाठी केलेल्या कडक नियमामध्ये काही प्रमाणात सुट दिली अाहे. त्याचा निश्चित असा फायदा या कसाेटीच्या अायाेजनाला हाेइल.

२ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची तिकिटे पहिल्याच दिवशी विक्री
भारत व यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यातील मर्यादित षटकांची वनडे मालिका २७ नाेव्हेंबरपासून सुरू होत आहे. कोरोनादरम्यान सरकारने स्टेडियममध्ये ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली. शुक्रवारीपासून तिकिटांची ऑनलाइन विक्री सुरू झाली. काही तासांत २ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांच्या सर्व तिकिटांची विक्री झाली. २७ नोव्हेंबर रोजी सिडनीमध्ये पहिला वनडे सामना रंगणार अाहे. पहिल्या वनडेची काही तिकिटे शिल्लक आहेत. वनडे आणि टी-२० सामने सिडनी आणि ओव्हलमध्ये होतील. ओव्हलची क्षमता १६ हजार आहे. म्हणजे ८ हजार चाहते येऊ शकतात. दुसरीकडे सिडनीची क्षमता ४८ हजार असून येथे २४ हजार चाहत्यांना प्रवेश मिळेल.त्यामुळे येथेही तिकिटांची विक्री झाली अाहे. याचा अायाेजकांना फायदा झाला.

बातम्या आणखी आहेत...