आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बॉडीगार्डने आत्महत्या केली. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात साक्ष आणि पुरावे द्यावे, यासाठी वैभव आणि त्यांचे सहकारी यांच्यावर मोठा दबाव पोलिसांकडून टाकण्यात आला. त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली. केवळ जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून हे सर्व प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
गृहमंत्री फडणवीसांना आव्हान
दरम्यान जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत. मात्र, ठाणे शहर आणि जिल्हा त्यांच्या हातात नाही. ठाण्यात सुरक्षा आणि कायदा व्यवस्था पाहिली तर फडणवीसांनी ठाण्याच्या पोलिस आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांना ठाण्याबाहेर पाठवावे, असे आव्हान जयंत पाटील यांनी दिले आहे. मग आम्ही म्हणू की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांमध्ये दम आहे, आणि ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली पोलिस खाते काम करत नाही यावर आम्ही वियवास ठेवू.
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे बॉडीगार्ड वैभव कदम यांनी आत्महत्या का केली? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. वैभव कदम यांच्यावर प्रचंड दबाव आणला जात होता, त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात साक्ष द्यावी यासाठी ठाणे पोलिसांकडून त्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
आत्महत्या प्रकरणात खोलात जावे
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, वैभव कदम यांनी आत्महत्या का केली, यांच्या खोलात कुणी गेले का? वैभव कदम ला पोलिस स्टेशनला बोलवत टॉर्चर करण्यात येत होते, दोन तीन वर्षांपूर्वी झालेल्या गुन्ह्यात जितेंद्र आव्हाड आरोपी आहेत. त्यांच्याविषयी आम्ही जे सांगतो तसे बोला, जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात साक्ष द्या, त्यासाठी त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधाने करण्यात आली.
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यासाठी ठाणे पोलिस प्रयत्न करत आहेत. त्सासाठी वैभव कदम यांच्यासोबत असलेल्या 6 ते 7 पोलिस कर्मचाऱ्सांना त्रास दिला जात आहे. खूप वेळ चौकशीसाठी बसवले जात आहे. आम्ही बोलतो तसे साक्ष आणि पुरावे तुम्ही द्या, असे म्हणत वैभव आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दबाव उेण्यात येत होता. त्यामुळे वैभव कदम यांनी आत्महत्या केली, यामागचे कारण शोधण्यासाठी खोलात जाण्याची गरज आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.