आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Hum To Wo Badnaam Hai Ki Badnamini Usmse Darti Hai Gulabrao Patal's Jalgaon Shayari; He Said That Even If Uddhav Thackeray Has It, Water Will Be Poured

बदनामी हमसे डरती है:मंत्री गुलाबराव पाटलांची शेरोशायरी; म्हणाले - ठाकरेंनाही पाणी पाजणार, तर अंधारे 3 महिन्यांचे बाळ

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हम तो वो बदनाम है की बदनामी हमसे डरती है, अशी शेरोशायरी मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात भाषणादरम्यान शायरी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसवाला असो की उद्धव ठाकरेंवाला. कोणी असला तरी त्याला पाणी पाजणार, असा इशाराही पाटील यांनी दिला. खोके अर्थात पैसे घेतल्याचे आरोप करण्यासाठी आम्हाला बदनाम करण्यासाठी काही लोक आमच्यावर सोडण्यात आले आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

काय म्हणाले पाटील?

गुलाबराव पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरेंना 40 आमदारांचे किंमत कळायली हवी होती. शिवसेनेतील 55 पैकी 40 आमदार जर बाहेर पडत असतील तर उद्धव ठाकरेंनी समजून घ्यायला हवे होते. आता कुटुंबशाहीचे नव्हे, तर सार्वजनिक विचार करणाऱ्यांचे राजकारण आहे, असा टोला ही गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंना कुटुंबाला लावला आहे. आमच्यावर टीका करण्यासाठी खास काही लोक सोडण्यात आले आहेत. शिवसेनाप्रमुखांची शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलल्याचा पुनर्रुच्चारही गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

कामात इमानदारी पाहिजे

गुलाबराव पाटील म्हणाले की, मी कामात इमानदार आहे. पाण्याच्या कामात माणूस इमानदार पाहिजे असे म्हणताना आता केवळ प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि मिल्ट्री मधला माणूस हेच इमानदार आहेत.

तुम्ही आमच्यावर टीका करणार?

नावाकरता सगळी धरपड आहे. उद्या माझा नातू गावात आला, तर तुम्ही सांगताल की हे तुझ्या आजोबांनी बांधले आहे. यासाठीच सर्व धरपड सुरू आहे. माझ्या खात्यामुळे मला काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे. आता आगामी काळात माझे कामच बोलेल असेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

अंधारे हे 3 महिन्याचे बाळ

शिवसेनेला आम्ही कधीच एकटे सोडले नाही.आमच्यावर केस झाल्या तरही आम्ही कायम शिवसेनेसोबत राहिलो. मात्र, आज 3 महिन्यापूर्वी राष्ट्रवादीतून आलेले लोक आमच्यावर टीका करत आहे. सुषमा अंधारे या सुषमा अंधारे हे 3 महिन्याचे इकडे आलेले बाळ आहेत. शिवसेनेसाठी आम्ही 35 वर्षे काम केले आहे आणि आताही शिवसेना वाचविण्यासाठी प्रयत्न करतोय, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. अंधारेंनी हिंदू देवतांवर भंयकर टीका केली आहे. ठाकरेंवर केलेली टीकाही पत्रकारांनी दाखवावी, असेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...