आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मस्ती जिरली:ट्रॅफिक पोलिसाला म्हणाला, वर्दी काढ इथेच दाखवतो; अवघ्या काही मिनिटांत अशी जिरली मस्ती! आता रडतानाचा व्हिडिओ व्हायरल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गैरवर्तन केल्याचा व्हिडियो आला समोर

एका ट्रफिक पोलिसांशी वाद घालतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही घटना मुंबईतील मीरा भाईंदर भागात घडली असून नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्याने ट्रफिक पोलिसांनी चालान फाडले. त्यानंतर गाडी मालक आणि त्यांच्या पत्नीने संबंधित ट्रफिक पोलिसांनी धमकी व मोठ्या प्रमाणावर शिवीगाळ केली. परंतु, काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व आरोपीला अटक केली. त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्याचे सर्व अंहकार गाळले आणि त्याने ढसाढसा रडायला सुरुवात केली.

गैरवर्तन केल्याचा व्हिडियो आला समोर
मीरा रोड पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी दुपारची असून आरोपींची ओळख अरुण रतन सिंग (36) आणि मीना अरुण सिंग (34) यांच्या नावाने झाली आहे. या व्हिडिओमध्ये हे नवरा बायको ट्रफिक पोलिसांशी वाद घालत गैरवर्तन करीत होते.

परंतु, ट्रफिक पोलिस त्यांना नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्याने कारवाई केल्याचे समजावून सांगत होता. परंतु, तरीदेखील दोघांकडून धमकी आणि मोठ्या प्रमाणावर शिवीगाळ केली जात होती. ही संपूर्ण घटनेचे व्हिडिओ ट्रफिक पोलिसांसोबत काम करणाऱ्या टोइंग हवालदारने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...