आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईतील घटना:धावत्या लोकल ट्रेनमधून पतीने पत्नीला खाली फेकले, काही महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न; आरोपी अटकेत

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपीविरोधात संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

मुंबईहून चेंबूर आणि गोवंडी रेल्वे स्टेशन दरम्यान एका व्यक्तीने धावत्या लोकल ट्रेनमधून आपल्या पत्नीला खाली फेकले. ही घटना सोमवारी दुपारची आहे. गुरुवारी पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात आरोपी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने महिलेला ट्रेनमधून खाली का फेकले हे अद्यापत स्पष्ट झालेले नाही.

अली शेख अन्वर असे आरोपीचे नाव आहे. पूनम चव्हाण आपल्या तीन वर्षाच्या मुलीसह ट्रेनमध्ये प्रवास करत होत्या. यावेळी त्याने पत्नी पूनमला खाली फेकले. दोघांनी काही महिन्यांपूर्वीच लव्ह मॅरेज केले होते. ही मुलगी पीडितेच्या पहिल्या लग्नासपासून झालेली होती.

अशाप्रकारे घडली ही घटना
सरकारी रेल्वे पोलिसांच्या (GRP) अधिकाऱ्याने सांगितले की, हे जोडपे रेल्वेच्या डब्याच्या दारात उभे होते. त्या अधिकाऱ्याने सांगितले की, ती महिला धावत्या ट्रेनमधून बाहेर पहात होती. तेव्हा तिच्या पतीने तिला पकडले आणि नंतर कथित रित्या तिला धक्का दिला, ज्यानंतर ती रुळावर पडली.

सोबत प्रवास करणार्‍या महिलेने तक्रार दिली
ट्रेन गोवंडी स्थानकावर थांबली तेव्हा त्याच डब्यात जोडप्याजवळ उभी असलेली एक महिला खाली आली आणि तिने रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की पोलिसांनी आरोपीला पकडले आणि त्याला घटनास्थळी नेले. जेथे जखमी अवस्थेत त्याची पत्नी बेशुद्ध पडली होती. पीडितेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

लहान मुलीला पीडितेच्या आईकडे सोपवले
आरोपीविरोधात संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्याला अटकही करण्यात आली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेच्या वेळी आरोपी नशेत होता की नाही याचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. त्यांनी सांगितले की या महिलेच्या मुलीला तिच्या आईकडे सोपवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...