आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दारुसाठी आणलेला चखना पत्नीने खाल्याच्या रागातून एका पतीने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवल्याची धक्कादायक घटना मुंबईतील विरारमध्ये घडली आहे. 50 टक्के जळालेल्या महिलेवर मागील तीन दिवसांपासून विरारमधील एका हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहे. डॉक्टरांनी सांगितले की, महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.
चखना खाल्यामुळे पती झाला नाराज
याप्रकरणी पोलिसांनी एका 50 वर्षीय वीरेंद्र परब नावाच्या व्यक्तीला अटक केले आहे. आरोपीला दारुचे व्यसन आहे. पोलिसांनी सांगितले की, मागच्या शनिवारी तो दारुच्या नशेत घरी आला आणि पत्नीला आपल्या सोबत आणलेला स्नॅक्स बनवायला सांगितला. पत्नी नमिताने तो स्नॅक्स बनवला आणि त्यातील काही घास खाल्ले.
यावरुन नाराज झालेल्या आरोपी वीरेंद्र परबने आधी पत्नीला बेदम मारहाण केली आणि नंतर पेट्रोल टाकून आग लावली. पत्नीला जाळल्यानंतर आरोपीला आपल्या कृत्याची जाण झाली आणि त्याने पत्नीला जवळच्या हॉस्पीटलमध्ये अॅडमिट केले. यानंतर पीडितेने आपल्या भावाला या घटनेची माहिती दिली. तो हॉस्पीटलमध्ये गेला, पण तोपर्यंत आरोपी घरार झाला होता. यानंतर पोलिसांनी पीडितेच्या सांगण्यावरुन आरोपी पतीला ताब्यात घेतले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.