आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबादचा सलग तिसरा पराभव:दिल्लीचा 21 धावांनी विजय, निकोलस पूरनची स्फोटक खेळी निष्फळ, खलीलने घेतल्या 3 विकेट्स

मुंबई15 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

आयपीएल 2022 च्या 50 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा 21 धावांनी पराभव केला. SRH कडे 208 धावांचे मोठे लक्ष्य होते, त्याला प्रत्युत्तरात संघाने 186/8 धावा केल्या आणि सामना गमावला. निकोलस पूरनने सर्वाधिक 62 धावा केल्या. दिल्लीच्या विजयात खलील अहमदने 3 बळी घेतले.

हैदराबादचा चालू स्पर्धेतील हा सलग तिसरा पराभव आहे. एसआरएचने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत. यादरम्यान 5 जिंकले तर 5 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचवेळी दिल्लीचा 10 सामन्यांमधला हा 5वा विजय ठरला.

तत्पूर्वी, नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 3 गडी गमावून 207 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक नाबाद 92 धावा केल्या, तर रोव्हमन पॉवेल 67 धावांवर नाबाद परतला. एसआरएचकडून भुवनेश्वर कुमार, शॉन अॅबॉट आणि श्रेयस गोपाल यांनी 1-1 बळी घेतला.

या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सामन्याचे हायलाईट्स

पूरनची बॅट तळपली

निकोलस पूरनने दमदार फलंदाजी करताना आपल्या आयपीएल कारकिर्दीतील चौथे अर्धशतक 29 चेंडूत पूर्ण केले. 34 चेंडूत 62 धावांची धडाकेबाज खेळी करून शार्दुल ठाकूरने त्याला बाद केले. त्याचा झेल पॉवेलने टिपला. चेन्नईविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही त्याने लक्ष्याचा पाठलाग करताना 33 चेंडूत नाबाद 64 धावा केल्या होत्या.

खलीलने घेतल्या 3 विकेट्स

खलील अहमदने अप्रतिम गोलंदाजी करत 4 षटकांत 3 बळी घेतले. वेगवान गोलंदाजाने अभिषेक शर्मा (7), एडन मार्कराम (42) आणि शॉन अॅबॉट (7) यांना बाद केले. त्याच्या स्पेलमध्ये, त्याने 7.50 च्या सरासरीने 30 धावा दिल्या.

 • खलील अहमदने या मोसमात 7 सामन्यात 14 विकेट घेतल्या आहेत.
 • खलीलने टी-20 क्रिकेटमध्ये 100 बळीही पूर्ण केले.

पूरन-मार्करम जोडीने जोडल्या धावा

हैदराबादने पहिले 3 गडी केवळ 37 धावांत गमावले होते. यानंतर एडन मार्करम आणि निकोलस पूरन यांनी चौथ्या विकेटसाठी 35 चेंडूत 60 धावांची भागीदारी केली. ही जोडी दिल्लीच्या विजयाच्या मार्गात अडचणी निर्माण करत होती. 13व्या षटकात खलील अहमदने मार्करमला बाद करून दिल्लीला चौथे यश मिळवून दिले. तो 25 चेंडूत 42 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

हैदराबादचे सलामीवीर फ्लॉप​​​​​​​

लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात खलील अहमदच्या चेंडूवर अभिषेक शर्माने (7) विकेट गमावली. कर्णधार केन विल्यमसनही 5व्या षटकात बाद झाला. 11 चेंडूत केवळ 5 धावा करून केनला एनरिक नॉर्टयाने बाद केले. या दोन्ही विकेट हैदराबादने अवघ्या 23 धावांवर गमावल्या. पॉवर प्लेमध्ये SRH चा रन रेट 5.83 होता.

पॉवेल आणि वॉर्नरची भागीदारी

डेव्हिड वॉर्नर आणि रोव्हमन पॉवेल यांनी चौथ्या विकेटसाठी 66 चेंडूत नाबाद 122 धावांची भागीदारी केली. आयपीएल 2022 मध्ये दिल्लीसाठी ही पहिली शतकी भागीदारी होती. या जोडीने मैदानात चौफेर फटकेबाजी करुन धावा केल्या आणि हैदराबादच्या गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले.

 • दिल्लीने शेवटच्या 5 षटकात केल्या 70 धावा
 • उमरान मलिकने 4 षटकात एकही विकेट न घेता 52 धावा दिल्या.
 • उमरानने या सामन्यात सध्याच्या स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू 157 धावांच्या वेगाने टाकला.

पॉवेलने दमदार खेळी केली

रोव्हमन पॉवेलने दमदार फलंदाजी करताना आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक 30 चेंडूत झळकावले. त्याने 35 चेंडूत नाबाद 67 धावा केल्या. या डावात त्याचा स्ट्राईक रेट 191.43 होता.

वॉर्नरची दमदार खेळी ​​​​​​

डेव्हिड वॉर्नरने शानदार फलंदाजी करताना 58 चेंडूत नाबाद 92 धावा केल्या. वॉर्नरने शतक पूर्ण केले नसले तरीही त्याची खेळी खूपच महत्वपुर्ण आणि खास होती. वास्तविक, यापूर्वी वॉर्नर सनरायझर्स हैदराबाद संघाकडूनच खेळायचा. 2021 मध्ये वॉर्नरच्या खराब फॉर्ममुळे त्याच्याकडून संघाचे कर्णधारपदच काढून घेण्यात आले नाही तर त्याला संघातून वगळण्यात आले होते.

 • आयपीएलमधील वॉर्नरचे हे ५४ वे शतक आणि एसआरएचविरुद्धचे पहिले अर्धशतक होते.
 • या मोसमात त्याने 8 डावात 356 धावा केल्या आहेत.
 • वॉर्नरचे टी-२० फॉरमॅटमधील हे ८९वे अर्धशतक होते.

षटकाराची हैट्रीक साधून पंत बाद

9व्या षटकात ऋषभ पंतने श्रेयस गोपालला लागोपाठ 3 षटकार आणि नंतर एक चौकार मारला, पण शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. दुसऱ्या चेंडूवर पंतने डीप मिडविकेटच्या दिशेने षटकार ठोकला. तिसऱ्या चेंडूवर साईटस्क्रीनच्या दिशेने षटकार ठोकला. चौथ्या चेंडूवर लाँग ऑफच्या डोक्यावरून षटकार मारला. 5व्या चेंडूवर ऋषभने कटिंग करताना सलग चौथा चौकार लगावला. मात्र, शेवटच्या चेंडूवर गोलंदाजाने त्याला आऊट केले.

पंतला कव्हरच्या दिशेने शॉट खेळायचा होता, पण चेंडू त्याच्या बॅटच्या जाड आतील काठाला लागला आणि स्टंपला लागला. ऋषभ पंत 16 चेंडूत 26 धावा करून बाद झाला. डेव्हिड वॉर्नर आणि पंत यांनी तिसऱ्या विकेटसाठी 29 चेंडूत 48 धावांची भागीदारी केली.

 • SRHसाठी श्रेयस गोपालची ही पहिली विकेट होती.
 • श्रेयसने आयपीएलमध्ये पहिल्यांदाच पंतला बाद केले.
 • पंतने या मोसमात 10 डावात 260 धावा केल्या आहेत.

पॉवर प्लेमध्ये डीसीने गमावले दोन गडी

दिल्ली कॅपिटल्ससाठी पहिली 6 षटके फारशी चांगली नव्हती. मनदीप सिंग पहिल्याच षटकात शून्य आणि 5व्या षटकात मिचेल मार्श (10) धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. या मोसमात पहिला सामना खेळताना मार्शची विकेट शॉन अबॉटने घेतली. दिल्लीने पॉवर प्लेमध्ये 7 चौकार आणि 1 षटकार लगावला. यादरम्यान संघाचा धावगती 8.33 होती.

मनदीप सिंग शून्यावर बाद

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना डीसीची सुरुवात खराब झाली. पहिल्या षटकाच्या 5व्या चेंडूवर मनदीप सिंग खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. भुवीने त्याला आपल्या जाळ्यात पकडले आणि बाद केले. भुवनेश्वरने प्रथम सलग दोन इनस्विंग टाकले आणि नंतर अचानक मनदीपला आऊटस्विंगवर पायचीत केले. दिल्लीच्या सलामीवीराच्या बॅटची बाहेरची कड घेत चेंडू कीपर पूरनच्या हातात गेला.

 • मनदीप आयपीएलमध्ये 14व्यांदा शून्यावर आऊट झाला.
 • सामन्याच्या पहिल्याच षटकात भुवीने विकेट घेण्याची ही 20वी वेळ आहे.
बातम्या आणखी आहेत...