आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्विस सेंटरला आग:मुंबईत पवईच्या साकी विहार रोडवरील हुंडाईच्या शोरूमला भीषण आग, कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक; शोरूममधून स्फोटाचा मोठा आवाज

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतील पवईच्या साकी विहार रोडवर लार्सन एंड टूब्रो कंपनीच्या समोर असलेल्या साई ऑटो हुंडाईच्या सर्व्हिस सेंटरला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग भीषण असल्याची माहिती मिळत आहे. शोरूम मधून मोठ्या स्फोटाचे आवाज येत असून, या शोरूममध्ये कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शोरूम बाजूच्या महावीर क्लासिक ही इमारत असून, यात अनेक कुंटूब राहतात. शोरूममधून मोठ्या प्रमाणात आवाज होत असल्याने या इमारतीत राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वाहतूक विभागाचे अधिकारी पोहोचले आहेत. या आगीमुळे आणि नागरिकांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊन मदत कार्याला उशीर होत आहे.

शोरूमला लागली आग
पवई इथल्या साकी विहार रोडवर भीषण आग लागली आहे. साई ऑटो हुंडाईच्या सर्व्हिस सेंटरला आग लागली लागल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरत आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्विस सेंटरच्या बाजूलाच असलेल्या महावीर क्लासिक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये आगीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीत कोट्यवधीच्या गाड्या जळून खाक झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...