आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

खुलासा:‘आत्महत्या करण्याचे विचार माझ्याही मनात आले होते’,मिलिंद देवरा यांचा धक्कादायक खुलासा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नैराश्यावर मात करत मी दुःखासोबत जगायला शिकलो

माझ्याही मनात आत्महत्येचे विचार आले होते. एकदा नाही तर दोनदा... लहान असताना एकदा आणि खासदार असताना दुसऱ्यांदा. मात्र नंतर नैराश्यावर मात करत मी दुःखासोबत जगायला शिकलो, असा धक्कादायक खुलासा काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी केला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येमुळे बॉलीवूडसह सर्वच क्षेत्रांतील दिग्गज हळहळले. अनेकांनी ट्विटच्या माध्यमातून सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. देवरा यांनीही ट्विटच्या माध्यमातून हा खुलासा केला आहे.

माझ्याही मनात आत्महत्येचे विचार आले होते, हे सांगतानाच देवरा यांनी नैराश्यावर कशी मात करावी याबाबत काही उपाय सुचवले आहेत. त्यानुसार कुटुंबीय, मित्र, सहकारी यांना भेटा, त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला. नैराश्य हे वय, लिंग, आर्थिक स्थिती, यश यावर अवलंबून नसते. ते कोणालाही येऊ शकते. म्हणूनच मानसिक आरोग्यासाठी मानसोपचारतज्ज्ञाकडे जा. आपल्या आतील राक्षसासोबत लढत राहा. त्याला कधीच बाहेर येऊ देऊ नका. आयुष्य सुंदर आहे. पुढे जाण्याच्या शर्यतीत अडकू नका. ज्या गोष्टींनी तुम्हाला आनंद मिळतो ते करा, संगीत, प्रवास, कुकिंग, वाचन, तुमचे छंद जोपासा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर प्रेम करा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

0