आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्णब कारागृहात:राम कदम अर्णब यांना भेटण्यासाठी तुरुंगाच्या दिशेने रवाना, कुणाची हिंमत असेल तर अडवून दाखवा; कदमांचे आव्हान

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्णब यांच्या जीवाला धोका, त्यांच्या केसालाही धक्का लागला तर...: राम कदम

इंटेरिअर डिझायनरला आत्महत्येसाठी प्रकृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जामीन याचिकेवर आज दुपारी 3 वाजता निर्णय होणार आहे. यादरम्यान भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम आज अर्णब यांना भेटण्यासाठी नवी मुंबईच्या तळोजा येथील कारागृहाच्या दिशेने निघाले आहेत ‘हिंमत असेल तर मला अडवून दाखवा’, असे जाहीर आव्हान राम कदम यांनी मुंबई पोलीस आणि राज्य सरकारला दिले आहे. याआधी माजी खासदार किरीट सोमैया अर्णब यांना भेटण्यासाठी तुरुंगात गेले होते.

राम कदम यांनी आज सकाळी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, ''अर्णब यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर त्यासाठी महाविकाआघाडी जबाबदार असेल. उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख तुम्हाला देशातील जनता कधीही माफ करणार नाही. तुम्ही जबरदस्तीने आणबाणी लादली आहे. मी माझ्या घरातून कारागृहाच्या दिशेने निघालो आहे, हिंमत असेल तर अडवून दाखवा.''

दरम्यान किरीट सोमय्या यांनी काल अर्णबला मारहाण करू नका अशी पोलिसांनी विनंती केली. याबाबत त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली.

राम कदम यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली होती. आज सकाळी 11 वाजता मी तळोजा कारागृहात जाऊन अर्णव गोस्वामी यांची भेट घेणार असल्याचे राम कदम यांनी म्हटले आहे. देशातील 130 कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी अर्णव गोस्वामी यांना भेटायला जाणार असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अर्णबच्या सुटकेसाठी कदमांची सिद्धीविनायकाची पायी वारी

दरम्यान कालच राम कदम हे अर्णव गोस्वामी यांच्या सुटकेसाठी घाटकोपर ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत पायी चालत गेले होते. अर्णव यांच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार असल्याचे ते म्हटले होते. त्याआधी राम कदम यांनी अर्णव गोस्वामी यांच्या सुटकेसाठी मंत्रालयाबाहेर उपोषण केले होते. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर राम कदम यांना हे आंदोलन मागे घ्यावे लागले होते.

संपादक अर्णब गोस्वामीसह तिघांची तळोजा कारागृहात रवानगी

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेले संपादक अर्णब गोस्वामी, फारुख शेख आणि नितेश सरडा या तिघांना रविवारी सकाळी अलिबाग येथून तळोजा कारागृहात हलवण्यात आले. सुरक्षा आणि हाय प्रोफाइल केस असल्याने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, अलिबाग तुरुंगाधिकाऱ्यांनी मारहाण केली असे पोलिस ‌व्हॅनमधून नेताना अर्णब ओरडत होते. तिघांना अलिबाग शहरातील शाळेच्या एका खोलीत ठेवण्यात आले होते. तिथे अर्णब मोबाइलचाही वापर करीत होते. त्यांना तळोजा येथे हलवण्याबाबत जिल्हा कारागृह अधीक्षक ए. टी. पाटील यांनी न्यायालयास विनंती केली होती. न्यायालयाने वरिष्ठांची परवानगी घेऊन निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार तिघांनाही हलवण्यात आले, अशी माहिती पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...