आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामी काल, आज, उद्या शिवसेनेतच आहे, भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही.. मुळात तशी गरज ही पडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना संपवू नये यासाठी मी उचललेले हे पाऊल असून येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल अशी भूमिका एकनाथ शिंदे गटात सामील झालेले आमदार योगेश कदम यांनी घेतली.
योगेश कदम यांनी एक ट्विट करून आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. ट्विटच्या सुरुवातीला सप्रेम जय महाराष्ट्र असेही त्यांनी म्हटले आहे.
काय आहे ट्विट?
मी काल, आज, उद्या शिवसेनेतचं..! भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही.. मुळात तशी गरज ही पडणार नाही.. रा. काँ. पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठी उचललेले हे पाऊल येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल. ही परिस्थिती मावळल्यावर दापोली मतदारसंघात शिवसेनेचा भगवाच हातात घेऊन येईल. संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मातोश्रीवर आधी निष्ठा आता दगाफटका
रामदास कदम यांचे पूत्र योगेश कदम हेही एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झाले आहेत. त्याआधी ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते, योगेश कदम बुधवारी सायंकाळनंतर गुवाहाटीला पोहचले आणि बंडखोर नेते शिंदे यांच्या गटात सामील झाले.
योगेश कदमांची स्पष्टोक्ती
आपण भाजमध्ये जाणार नाही. शिवसेनेतच आपण आहोत असे स्पष्ट करताना त्यांनी शिवसेना संपवू नये याची भीती व्यक्त करीत राष्ट्रवादीला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवले. त्यांच्यामुळे शिवसेना संपवण्याची भीती कदम यांनी व्यक्त केली. आपण काल आज आणि उद्याही शिवसेनेतच असू असेही ट्विटद्वारे सांगीतले पण ती शिवसेना उद्धव ठाकरेंची नसेल तर एकनाथ शिंदे यांची असेल याचा मात्र त्यांनी खूलासा केलाच नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.