आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • I Am Just Sitting, Overthrow The Government While My Interview Is Going On, Chief Minister Uddhav Thackeray Challenges The Opposition Party

मुख्यमंत्र्यांची मुलाखत:मी तर बसलेलोच आहे, माझी मुलाखत चालू असताना सरकार पाडा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आव्हान

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मी साठीत मुख्यमंत्री असलो तरी, 'या साठीच केला होता अट्टाहास' असं नाहीये, हा योगायोग आहे - मुख्यमंत्री

शिवसेनेचे खासदार आणि शिवसेना मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची एक शरद, सगळे गारद या शिर्षकाखाली मुलाखत घेतली. या मुलाखतीत पवारांनी अनेक खुलासे केले. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत त्यांनी घेतली आहे. याचा एक प्रोमो राऊतांनी शेअर केला आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना थेट अव्हान दिले आहे. माझं काय मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत चालू असताना सरकार पाडा असं आव्हान त्यांनी केलं. 

संजय राऊतांनी आज ट्विटवर मुलाखतीचा प्रोमो शेअर केला. ' मी तर बसलेलोच आहे, माझी मुलाखत चालू असतानाच सरकार पाडा, असं थेट आव्हान केलं आहे मुख्यमंत्र्यांनी विरोधीपक्षांना केलं आहे. महाराष्ट्रात तीन चाकी सरकार. मग केंद्रात किती चाकी आहे? असे कॅप्शन देत राऊतांनी हा प्रोमो शेअर केला आहे. वारंवार  महाविकास आघाडी सरकारवर तीन चाकी सरकार आहे असा आरोप केला जातो. या राऊतांच्या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, केंद्रात किती चाक आहेत. याचाही विचार करा.  तसेच पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, मी वयाच्या साठाव्या वर्षी मुख्यमंत्री झालो असलो तरी 'याचसाठी केला होता अट्टाहास' असं नाही. हा केवळ योगायोग आहे.

पुढे बोलताना राऊतांनी प्रश्न केला की, संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला शिवसेना पसरवायची आहे? आत्मनिर्भर शिवसेना आपल्याला करायची आहे? यावर उत्तर देत मुख्यमंत्री म्हणाले की, मी आजदेखील माझी सही आपला नम्र म्हणूनच करतो. यानंतर राऊतांनी केंद्रातील धोरणांवरील मत ठाकरेंना विचारले. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, आज तुम्हाला चीन नको आहे, मात्र पुढे जाऊन कालांतराने भारत-चिनी भाईभाई होणार नाही का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी या प्रोमोमध्ये केला आहे.