आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामी काही आमदार संतोष बांगर नाही, जो एक म्हणेल आणि पलटी मारेल, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच राहणार आहे असे परभणीचे खासदार संजय जाधव उर्फ (बंडू जाधव) यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले आहे. मी थोड्याच वेळात शिवाजी पार्कवर कार्यकर्त्यासह पोहचणार असून कायम शिवसेनेसोबत राहणार आहे. हे मी आधी देखील सांगितले आहे, असे सांगतानाच जे असे म्हटले असेल त्यांला माझया समोर आणा अमग सांगतो असा इशाराही त्यांनी देत राजकीय वर्तुळात सुरू असलेली दबक्या आवाजातील चर्चा बंद केली आहे.
नेमकी काय आहे घटना?
शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्यात आज शिवसेनेचे आणखी 2 खासदार आणि 5 आमदार प्रवेश करणार आहेत, असा दावा शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. मात्र, हे आमदार, खासदार कोण? त्यांची नावे तुमाने यांनी जाहीर केली नाही. त्यामुळे आज शिंदे गटात शिवसेनेतून आणखी कोण-कोण प्रवेश करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
परभणीत शिवसेनेचाच खासदार
परभणीचे खासदार असलेले अशोक देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे, गणेश दुधगावकर यांनी शिवसेनेशी पक्षद्रोह केला होता. माऋ यानंतर त्यांना शिवसैनिकांनी निवडून येऊ दिले नाही गेली 30 वर्षे या मतदारसंघात वर्ष भराचा अपवाद सोडता शिवसेनेचाच खासदार आहे. असे असताना खासदार जाधव पक्ष सोडणार नाहीच असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
काय म्हणाले कृपाल तुमाने?
नागपुरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा दावा केला. तुमाने म्हणाले, आज वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात मुंबईतील आणि मराठवाड्यातील प्रत्येकी एक खासदार शिंदे गटात येईल. तर, शिवसेनेतील पाच आमदारही शिंदे गटात सहभागी होतील. मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहेत. त्यामुळे त्यांचीच शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचेही तुमाने म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.