आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे विरुद्ध शिवसेना:एमआयएम भाजपची बी टीम तर, मनसेला सी टीमचे काम मिळाले - आदित्य ठाकरे यांची मनसेवर जोरदार टीका

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात शिवसेना विरुद्ध मनसे हा संघर्ष पाहायला मिळतो आहे. राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीका केल्याने शिवसेनेकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आदित्य ठाकरेंनी मनसेवर टीका करताना मनसेला भाजपची सी टीम म्हणून काम मिळाले याचे बरे वाटले. आधी मी मनसेला टाईमपास टोळी म्हणत होतो. पण आता त्यांना भाजपचे काम मिळाले आहे, अशी जहरी टीका युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

शिवसेना हिंदुत्व सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मागे लागली आहे. केवळ निवडणुकीची निकाल पाहिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची टूम काढली, अशी घणाघाती टीका राज ठाकरेंनी शिवसेनेवर केली होती. या वक्तव्याचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला आहे.

नेमके काय म्हणाले आदित्य ठाकरे?
मनसे ही भाजपची सी टीम आहे. या आधी मी त्यांना टाईमपास टोळी म्हणत होतो. मात्र आता त्यांना काम मिळाल्याने मी खूश आहे. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे, त्यानंतर आता मनसेला भाजपच्या सी टीमचे काम मिळाले आहे, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला आहे. याआधी संजय राऊत यांनीही राज ठाकरेंवर विखारी टीका केली होती. आणि आता आदित्य ठाकरेंनी काका राज ठाकरेंवर टीका केल्याने राज्यातील राजकारण तापणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राज ठाकरे काय बोलले होते ?

राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की उद्धव ठाकरेंना 2019 च्या निवडणुकाच्या वेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात निवडणूक लढवली होती. आणि निवडणूक होताच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा साक्षात्कार झाला होता. यानंतर ज्याच्या विरोधात लढले त्यांनाच सोबत घेत शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी केली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात सभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसच होतील, असे सांगितले होते, यावेळी उद्धव ठाकरे हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. असे म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

बातम्या आणखी आहेत...