आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार गृहखात्यावर नाराज:एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचे कसे कळाले नाही, सिलव्हर ओकवर खलबत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचे कसे कळाले नाही, असा सवाल करत मविआ निर्माते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गृहखात्यावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. बंडखोर गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर आज सिलव्हर ओकवर बैठक पार पडली. या बैठकीत जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.

एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या हालचालींची राज्याच्या गुप्तचर यंत्रणेला कल्पना आली नाही, मंत्र्यांना पोलिसांची सुरक्षा असते, गुजरातच्या सीमेपर्यंत पोलिस त्यांच्यासोबत होते. तरीही मंत्री, आमदारांच्या हालचालींची माहिती गृहखात्याला कशी मिळाली नाही, हे सवाल बैठकीत उपस्थित झाले तर राजकीय परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

वर्षा निवास्थानी शिवसेना आमदार आणि खासदारांची बैठक
शिवसेनेच्या गोटातही प्रचंड हालचाल सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत विधानसभा बरखास्त करण्याचे सकेंत दिले आहेत. तर सायकांळी शिवसेना आमदार आणि खासदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कोण उपस्थित राहणार आणि कोणाची अनुपस्थिती असणार? याबाबतही उत्सुकता आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या घरी बैठक
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींची काँग्रेसच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनीसुद्धा गंभीर दखल घेतली आहे. काँग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते कमलनाथ हे महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. काँग्रेसने महाराष्ट्राची जबाबदारी कमलनाथ यांच्या खांद्यावर सोपवली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या घरी काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी नेमकी काय रणनीती आखली जाते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी बैठक

भाजपच्या गोटातही प्रचंड हालचाल सुरु आहे. भाजप नेत्यांची देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी बैठक पार पडणार आहे. संजय राऊत यांच्या विधानसभा बरखास्त करण्याच्या सकेंतानंतर भाजप काय भूमिका घेते, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. ​​​ एकंदरीत परिस्थिती पाहता या घडामोडी कोणत्या पातळीवर जाऊन पोहोचतात याबाबत मात्र प्रचंड उत्सुकता आहे.