आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेनेचे प्रत्युत्तर:मनसे पक्ष आहे की संघटना, हेच मला कळत नाही; आदित्य ठाकरेंचा मनसेला खोचक टोला

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनसेकडून सेनेचा वीरप्पन टोळी असा उल्लेख

मनसे नेते संदिप देशपांडे यांनी शिवसेनेचा वरीप्पन टोळी असा उल्लेख केला होता. त्याला आता शिवसेने नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रत्युत्तर दिले आहे. 'मनसे ही टाईमपास टोळी आहे,' असा खोचक टोला अदित्य ठाकरेंनी लगावला. आदित्य ठाकरेंनी चेंबूरमधील भक्ती पार्क परिसरात मियावाकी बागेची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, ' मनसे पक्ष आहे की, संघटना हेच मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यायचं?' असा टोला ठाकरेंनी लगावला.

काय म्हणाले होते संदिप देशपांडे ?

मनसे नेते संदिप देशपांडे यांनी शिवसेनेचा उल्लेख वरीप्पन असा केला होता. ते म्हणाले की, 'मुंबई महापालिकेत वीरप्पन गँग काम करत आहे. ही वीरप्पन गँग महापालिकेची भरमसाठ लूट करत आहे. वीरप्पनने जेवढे लोकांना लुटले नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटले आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत वीरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल,' असे म्हणत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागले होते.