आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका:हवं तर तुम्हाला श्रेय देतो, पण हा कद्रूपणा सोडा; कांजूर मेट्रोच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आवाहन

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • होय मी अहंकारी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला भाजपच्या टीकेवर पलटवार

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मेट्रो कारशेड आणि कांजूरमार्ग यासंदर्भात विरोधकांना चांगलंच प्रत्युत्तर दिले. कांजूर कारशेडच्या मुद्द्यावरून सुरू असलेला वाद राज्यातील जनतेच्या हिताचा नाही. हा विषय आपल्या प्रतिष्ठेचा करून खेचाखेची करू नका. हवं तर तुम्हाला कांजूर कारशेडचे श्रेय देतो. पण कद्रूपणा करू नका, हा कद्रूपणा सोडा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केले आहे.

कांजूर मार्ग मेट्रो कारशेडचा वाद जनतेच्या हिताचा नाही. त्यामुळे त्याला आपल्या प्रतिष्ठेचा विषय करू नका. तुमची जागा आणि माझी जागा असे म्हणून खेचाखेची करू नका. माझे विरोधी पक्षाला आवाहन आहे, या बसून चर्चा करू आणि प्रश्न सोडवू. तुम्ही हा प्रश्न सोडवा. हवं तर तुम्हाला श्रेय देतो. इथे माझ्या इगोचा प्रश्न नाही. तसेच तुमच्याही इगोचा प्रश्न असता कामा नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला भाजपच्या टीकेवर पलटवार

दरम्यान काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरुन राज्याचे होणारे नुकसान सांगितले होते. तसेच उद्धव ठाकरे अहंकारी आहेत असेही फडणवीस म्हणाले होते. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “मेट्रो कारशेडच्या विषयावरून सध्या थयथयाट केला जातोय. मात्र माझ्या मुंबईबद्दल मी अहंकारी आहे. माझ्या मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे.”

“आरेला केवळ मेट्रो 3ची लाईन होणार होती. मात्र आता कांजूरच्या ठिकाणी मेट्रो 3, 4 तसंच 6 या तीन लाईनचे कारशेड करू शकतो. पुढच्या 50 वर्षांच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे आता आम्ही करतोय, ते अहंकार आहे की कर्तव्य हे आता तुम्हीच सांगा,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...