आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्युत्तर:माझ्या खात्याचे निर्णय घेण्याचे मला पूर्ण स्वातंत्र्य : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्यात “मातोश्री’चा हस्तक्षेप होत असून ते शिवसेनेला कंटाळले आहेत. लवकरच ते निर्णय घेतील, त्यांचे आम्ही स्वागत करू,’ असा खळबळजनक दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वसईत केला होता. राणे यांचा हा दावा एकनाथ शिंदे यांनी रविवारी स्पष्टपणे खोडून काढला.

नारायण राणेंच्या या वक्तव्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी एका दृश्यचित्रफितीच्या माध्यमातून समाज माध्यमावर राणे यांना प्रत्युत्तर देत खुलासा केला आहे. “माझ्या नाराजीचा शोध राणेंनी कुठून लावला माहीत नाही. पण त्यात तथ्य नाही. मला माझ्या खात्याचे निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. मी माझ्या पक्षात आणि विभागात मोकळेपणाने काम करतो. मी समाधानी आहे. निर्णय स्वातंत्र्य असल्यामुळेच लोकहिताचे निर्णय मी घेऊ शकलो, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्रिपदी नुकतीच वर्णी लागलेल्या नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. शनिवारी ही यात्रा वसई येथे होती. त्यावेळी बोलताना राणे यांनी शिवसेनेत मतभेद असल्याचे म्हटले होते. एकनाथ शिंदे यांच्या खात्यात “मातोश्री’चा व मुख्यमंत्र्यांचा प्रचंड हस्तक्षेप आहे. त्यामुळे शिंदे कंटाळले आहेत. ते पर्यायाच्या शोधात असून लवकरच योग्य निर्णय घेतील,’ असे राणे म्हणाले होते. दरम्यान, यांच्या वक्तव्याचा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी देखील समाचार घेत राणे यांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे सांगत भाजप त्यांचा वापर करून घेत असल्याचे सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...