आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेनड्राईव्ह बाँम्ब:फडणवीसांनी सादर केलेले असे पेनड्राइव्ह खूपदा बघितले. योग्य वेळी सीडी बाहेर काढणार, एकनाथ खडसेंचा इशारा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फडणवीसांनी सादर केलेल्या पेनड्राईव्ह बाँम्बची खिल्ली उडवित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान साधले. अशा प्रकारच्या सीडी आणि पेन ड्राइव्ह खूप बघितल्या आहेत. दाऊदशी संबंध जोडल्याने प्रसिद्धी मिळते असे सांगतानाच योग्य वेळ आल्यानंतर सीडी बाहेर काढणार असल्याचा इशारा खडसे यांनी दिला.

राज्यातील भाजप नेत्यांना अडकिवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विधानसभेच्या सभागृहातच व्हिडिओ स्वरूपात पुरावे असलेला 'पेन ड्राइव्ह' सादर करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर या प्रकरणावरून सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

फडणवीसांनी विधानसभेत सादर केलेल्या पेनड्राइव्ह बॉम्बनंतर आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढणार अशी चर्चा सुरू आहे. आज, बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी याबाबत माध्यमांनी विचारले असता, सीडी कधी बाहेर येईल, हे त्यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले खडसे?

माझ्यामागे ईडी लावली तर, मी सीडी लावेन, असा इशारा खडसेंनी अनेकदा दिला होता. आता विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राइव्ह सादर केल्यानंतर, आता खडसे सीडी कधी सादर करणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. आज त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता, खडसेंनी सूचक विधान केले. यावेळी त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. सीडी बाहेर काढण्याची योग्य वेळ अद्याप आली नाही. ती योग्य वेळी बाहेर काढणार आहे, असे खडसे म्हणाले.

माझेही जोडले होते दाऊदशी संबंध

दाऊदशी संबंध जोडल्याने प्रसिद्धी मिळते, माझेही तशाच प्रकारे संबंध जोडले गेले, असा टोला खडसे यांनी विरोधकांना लगावला. अशा प्रकारच्या सीडी, पेन ड्राइव्ह मी खूपदा बघितले आहेत. त्यामुळे त्याच्यातील तथ्य चौकशीअंतीच बाहेर येईल, असा टोला खडसे यांनी फडणवीस यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...