आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभा निवडणूक:मी नियमानुसारच पक्षाच्या एजंटना माझे मतदान दाखवलं, - मंत्री जितेंद्र आव्हाड

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीतील अभूतपूर्व गांेधळानंतर रात्री दहाच्या सुमारास मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “मी साडेबाराला विधानसभेत पोहोचलो, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेलो. त्यानंतर जाऊन मतदान केलं. त्यानंतर माझ्या पक्षांचे एजंट होते त्यांना मतदान दाखवायचं असते. कागद माझ्या छातीवर होता, कॅमेरा माझ्या मागे होता. तिथं मी हसलो, याला कारण होतं. मतपत्रिका बंद करून आलो, मतदान केलं आणि गेटवर आलो. माझं मतदान ज्या व्यक्तीला दाखवायचं असतं, नियमाने त्यांना मतदान दाखवलं. ते न दाखवल्यास मला माझी पार्टी निलंबित करू शकते. मात्र आता हा मुद्दाम संभ्रम निर्माण केला जात आहे. “मी मतदानात जी कृती केली त्यात मत बाद व्हावं असं काही झालेलं नाही. महाराष्ट्रासमोर आम्ही चुका केल्या असं जाऊ नये. सध्या काय घडतंय हे महाराष्ट्राला कळत आहे. जे काय सुरू आहे ते वेदनादायक आहे. आम्हीही २०-२५ वर्षांपासून आमदार आहोत. उगाच रडीचा डाव खेळला जात आहे.”

लोकशाहीची हास्यजत्रा किती काळ चालू ठेवणार?
^भारतीय जनता पक्षाने देशातील लोकशाही, न्यायव्यवस्था, केंद्रीय तपास यंत्रणा आणि निवडणूक आयोगासदेखील पकडीत घेतले आहे. महाराष्ट्रात तीन मतांबाबत निर्णय घ्यायला ७ तास लागतात? कमाल आहे. लोकशाहीची हास्यजत्रा किती काळ चालू ठेवणार? जिंकणार तर महाविकास आघाडीच! जय महाराष्ट्र! - संजय राऊत, शिवसेना

आजपासून भारतीय जनता पार्टीची उलटी गणती
^“भारतीय जनता पार्टीने देशात जी कटुता निर्माण केली आहे, त्याचे परिणाम पाहायला मिळणार आहेत. आजपासून भाजपची उलटी गणती सुरू होईल. भारतीय जनता पार्टीने कितीही सत्तेचा दुरुपयोग केला तरी त्याचा फायदा होणार नाही. शेवटी लोकांचाच विजय होणार आहे.
- नाना पटाेले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

सर्व मंत्र्यांना मुंबईत थांबण्याचे आदेश
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शनिवारचा पिंपरी चिंचवडचा दौरा रद्द झाला.महाविकास आघाडीच्या सर्व मंत्र्यांना मुंबईतच थांबण्याचे आदेश वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राज्यसभेचे उमेदवार पीयूष गोयल यांचा जिनेव्हातील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...