आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाउत्सव कार्यक्रमात अमृता फडणवीसांच्या गाण्यांवरून त्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला होता. त्यावरून अमृता फडणवीसांनी ट्विट करत उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. मला वाटलं आजपर्यंत एकच व्यक्ती गाते असा टोला नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी लगावला होता. यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विटरद्वारे आपला संताप व्यक्त करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं, अब्जाधीश फक्तं आपणच आहात. आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे. छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी पलटवरा केला. याशिवाय उद्धव ठाकरे यांना ट्विट टॅग देखील केलं आहे.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
राज्यातल्या विविध अधिकाऱ्यांनी आपली कला सादर करावी, यासाठी ठाकरे सरकारने महाउत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये पोलीस कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचाऱ्यासोबत IAS अधिकाऱ्यांना देखील आपली कला या मंचावर सादर केली. या महाउत्सवात राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी देखील आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने सर्वांची मनं जिंकली. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अमृता फडणवीस याचं नाव न घेता टोमणा मारला. रामनुकुमार श्रीवास्तव जेव्हा मुख्य सचिव झाले तेव्हा आदित्यने मला सांगितलं की बाबा आपले मुख्य सचिव उत्तम गातात. मला धक्का होता, मला वाटलं आजपर्यंत एकच व्यक्ती गाते, बाकीचे सुद्धा गातात, असे म्हणत अमृता फडणवीस यांना टोला लगावला.
भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये शीतयुद्ध रंगल्याचे पाहायला मिळते. एकमेंकाना शह-काटशह देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमृता फडणवीस शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यापूर्वीही अमृता यांनी एका ट्विटद्वारे त्यांनी उद्धव यांचा उल्लेख 'भोगी' असा करुन त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा सल्ला दिला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.