आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खांदेपालट:10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; डाॅ. अभिजित चौधरींची बदली, जी. श्रीकांत छत्रपती संभाजीनगरचे महापालिका आयुक्त

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाने 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची राज्य कर सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्य कर विभागातील सहआयुक्त, जी. श्रीकांत, यांची छत्रपती संभाजीनगर येथे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.

राज्य शासनाने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या काही दिवसांपूर्वीच केल्या होत्या. त्यानंतर आता आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

अशा आहेत बदल्या

  • डॉ. नितीन करीर,आयएएस (1988) यांना एसीएस (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  • मिलिंद म्हैसकर, आयएएस (1992) यांची ACS (1), सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • महाट्रान्सको मुंबईचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डी. टी. वाघमारे, आयएएस (1994) यांची प्रधान सचिव (A&S), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • राधिका रस्तोगी, आयएएस (1995) यांची प्रधान सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मुंबईतील एएमसी आणि बीएमसीतून डॉ. संजीव कुमार, आयएएस (2003) यांची महाट्रान्सको मुंबईचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • श्रावण हर्डीकर, आयएएस (2005) यांची AMC, BMC, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • तुकाराम मुंढे, आयएएस (2005) यांची सचिव (कृषी) आणि (शेती विकास निधी) विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • राज्य कर विभागाचे छत्रपती संभाजीनगर येथील सहआयुक्त, जी. श्रीकांत, आयएएस (2009) यांची छत्रपती संभाजीनगर येथे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.
  • छत्रपती संभाजीनगर येथील महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, आयएएस (2011) यांची छत्रपती संभाजीनगर येथेच राज्य कर सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • नागपूर​​​​​​ येथील​ टेक्सटाईल संचालक पी. शिव शंकर, आयएएस (2011) यांची साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.