आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरारमधील ICICI बँकेत दरोडा:माजी कर्मचाऱ्याने बँकेत घुसून केली मॅनेजरची हत्या, कॅशियर जखमी; पळून जाताना लोकांनी आरोपीला पकडून केली बेदम मारहाण

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपीला पकडून केली बेदम मारहाण

मुंबईतील विरारमध्ये गुरुवारी रात्री एक मोठी घटना घडली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या एका शाखेत रात्री आठच्या सुमारास बँकेच्या माजी कर्मचार्‍याने बँकेवर हल्ला करत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यात एका महिला बँक मॅनजेरची हत्या करण्यात आली असून एक रोखपाल गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे विरार शहरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयसीआयसीआय बँकेची विरार पूर्वेला मनवेल पाडा येथे शाखा आहे. घटना रात्री आठ वाजता घडल्याने बँकमधील इतर सर्व कर्मचारी घरी गेले होते. परंतु, यावेळी बँक व्यवस्थापक श्वेता देवरुख (32) आणि योगिता वर्तक (34) बँकेत काम करत होते. दरम्यान, बँकेचे माजी व्यवस्थापक अनिल दुबे बँकेत घूसून रोख आणि दागिने लुटण्याचा प्रयत्न केला.

घटनेदरम्यान बँक व्यवस्थापकाचा जागीच मृत्यू झाला आहे
घटनेदरम्यान बँक व्यवस्थापकाचा जागीच मृत्यू झाला आहे

व्यवस्थापकाचा जागीच मृत्यू
माजी व्यवस्थापक अनिल दुबेला पाहून दोन्ही महिला त्यांच्याशी भिडला. यानंतर प्रकरणे इतके वाढले की आरोपीने दोघांवर चाकूने जोरदार हल्ला केला. दरम्यान, या घटनेत व्यवस्थापक योगिता वर्तक यांचा जागीच घटनास्थळी मृत्यू झाला, तर रोखपाल श्वेता गंभीर जखमी झाल्या आहे. त्यांना खाजगी रग्णालयात दाखल करण्यात आले असून तीच्यावर उपचार सुरु आहे.

घटनेच्या थोड्या वेळानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही महिलांना रुग्णालयात दाखल केले.
घटनेच्या थोड्या वेळानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही महिलांना रुग्णालयात दाखल केले.

आरोपीला पकडून केली बेदम मारहाण
घटनेदरम्यान, आरोपी अनिल दुबे बँकेतील रोख रक्कम घेऊन पळून जाण्याच्या तयारीत होता. परंतु, यावेळी लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. पोलिसांच्या माहितीनुसार, लोकांनी केलेल्या बेदम मारहाणीत आरोपी गंभीर जखमी झाला असल्याचे सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...