आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे विरुद्ध मविआ:हिंदुत्वाच सोंग पांघरलेल्या लांडग्यांना वेळीच ओळखा; विद्या चव्हाण यांचा भाजपवर हल्लाबोल

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा रविवारी एक मे रोजी औरंगाबादमध्ये पार पडली. यावेळी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे. भोंगे निघणार नसतील तर मग दुप्पट आवाजात मशीदींसमोर हनुमान चालिसा वाजविण्याचे निर्देश त्यांनी मनसैनिकांना दिले. यावरून राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप हा कलयुगातील 100 तोंडी रावण असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच हिंदुत्वाच सोंग पांघरलेल्या लांडग्यांना वेळीच ओळखण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

कलियुगातील,....."100 मुखी भाजपारुपी रावण" लक्ष्मणाला हनुमाना सहित आपल्याकडे ओढून....! भावा-भावांमध्ये वैर आणण्याचा दृष्ट प्रयत्न करत आहेत..... तो खऱ्या हिंदूंनीच हाणून पाडला पाहिजे. *हिंदुत्वाच सोंग पांघरलेल्या लांडग्यांना वेळीच ओळखा* ....!, असे टि्वट विद्या चव्हाण यांनी केले आहे.

भाऊ मुख्यमंत्री झाल्याने तडफड -
याशिवाय, राज ठाकरे यांच्या भाषणावर राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. राज ठाकरेंचे मूळ दुखणे हे आपला भाऊ मुख्यमंत्री व पुतणे मंत्री झाल्याचे असून, वरून ते पवार साहेबांमुळे (शरद पवारांमुळे) झाले याचे दुःख अजूनचं जास्त आहे. भाऊ मुख्यमंत्री झाल्याच्या त्रासाने होणारी तडफड संपूर्ण देश व महाराष्ट्र बघत आहे, असा खोचक टोला वरपे यांनी लगावला आहे. तसेच वरपे यांनी राज यांच्या सभेची तुलना जेसीबीचं खोदकामाशी केली. एखाद्या ठिकाणी जेसीबी काम करायला आल्यावर लोकं जेसीबीला बघायला येतात, त्यांना त्या कामाशी काही देणं घेणं नसते. अगदी तसेच राज ठाकरेंच्या सभेला लोकं जातात, त्यांना ऐकतात पण त्यांच्या मताशी त्यांना काही घेणंदेणं नसते. लोकांचा मूळ उद्देश हा फक्त आणि फक्त टाईमपास असतो, असे वरपे म्हणाले.

राज ठाकरे विरुद्ध मविआ -
औरंगाबादमधील सभेनंतर मनसे विरुद्ध महाविकास आघाडी सरकारचा संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे. औरंगाबाद इथल्या सभेनंतर आता मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई होत आहे. मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवण्यात येत असून औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई सुरू झाली आहे. औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंच्या सभेसाठी काही अटी घालून दिल्या होत्या. या अटींचं पालन सभेदरम्यान झालं का, याची शहानिशा पोलिस करत आहेत. किती अटींचे उल्लंघन झाले याचा अहवाल तयार करून गुन्हा दाखल करण्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले आहे.

राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबईमध्ये उद्या वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. यामुळे राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...