आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:मला कोरोना झाल्यास सरकारी रुग्णालयामध्येच भरती करावे, देवेंद्र फडणवीसांचा गिरीश महाजनांना भावनिक फोन

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फडणवीस महिनाभरापासून राज्यात विविध भागात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी फिरत आहेत

‘गिरीश, मला कोविड झाला तर मुंबईत सरकारी रुग्णालयात भरती करा, खासगी रुग्णालयात दाखल करू नका,’ असे भावनिक आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जवळचे सहकारी गिरीश महाजन यांना फोन करून केले. त्यामुळे महाजन यांच्या अंगावर शहारे आले आणि त्यांना बराच वेळ काय बोलावे हेच सुचले नाही, असे वृत्त समोर आले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महिनाभरापासून राज्यात विविध भागात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी फिरत आहेत. पालिका तसेच आरोग्य प्रशासनाशी चर्चा करताना कोविड रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेऊन आस्थेवाईकपणे विचारपूस करत आहेत. राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना आणि काही आमदारांनाही कोरोनाची लागण झाल्याने फडणवीस यांनाही कोरोना होण्याची भीती वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी गिरीश महाजन यांना फोन करून सूचना केली. ‘गिरीश, मला कोविड झाला तर मला मुंबईत सरकारी दवाखान्यात भरती करा. खासगी रुग्णालयात भरती करू नका,’ फडणवीसांच्या अनपेक्षितपणे संवादाने महाजन यांच्या अंगावर शहारे आले आणि त्यांना काय बोलावे हेच कळेना. त्यामुळे काही वेळ तेही स्तब्ध झाले. दरम्यान, फडणवीस यांच्या या संभाषणाचा मेसेज ट्विटरवर तुफान व्हायरल झाला आहे. त्यातील दोन ट्विट महाजन यांनी रिटि्वट केल्याने फडणवीस यांनी फोन केल्याच्या वृत्ताला महाजन यांनी दुजोरा दिल्याचे स्पष्ट होत आहे.