आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''नेहमी जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन होत असते, आता ऑगस्ट सुरु आहे. एक महिना झाला तरी यांना मुहुर्त मिळेना की, का कुठलं ग्रीन सिग्नल मिळेना किंवा शिंदे- फडणवीसांचे एकवाक्यता होईना काय कशाला घाबरत आहेत? हे कळायला मार्ग नाही, पण राज्याची तेरा कोटी जनता आशेने पाहत आहेत. आता याला जबाबदार कोण हे जनतेने ठरवत राज्यकारभारच हाती घ्यावा, असा जोरदार प्रहार विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी विद्यमान राज्य सरकारवर केला.
माहिती घेऊन प्रश्न विचारा!
अजित पवार म्हणाले, कुणी सरकारमध्ये आले तरीही काम करताना कायदा, नियम , संविधान या अधीन राहून प्रत्येकाने काम करायला हवे या विचाराचा मी आहे. मी राज्यपालांना दुष्काळी दौऱ्याबाबत भेटलो नाही तर पूरग्रस्तग्रस्त भागांत दौरा केल्यानंतर मी राज्यपालांना भेटलो. आता महाराष्ट्रात कुठेही दुष्काळ नाही. प्रश्न विचारताना माहिती घेऊन विचारत चला.
लोक आत्महत्येचे पाऊल उचलत आहे
अजित पवार म्हणाले, मी, भुजबळ आणि आमदारांसोबत राज्यपालांची भेट घेतली. याशिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तिघांना जे काही पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे नुकसान, पीक उद्धवस्त झाली. गोगलगायींचा प्रादुर्भाव आहे. पाळीव प्राण्यांची हाणी, घरांचे पडझड, रस्त्यांचा प्रश्न दुरावस्थाही झाली. लोक आत्महत्या करण्यापर्यंत पाऊले उचलत आहेत. हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही.
लवकर मंत्रिमंडळ गठीत करा
अजित पवार म्हणाले, पूल खचल्याने लोकांचा संपर्क तुटलेला आहे. यानंतरही पाऊस बरसणार आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना लवकर मंत्रिमंडळ गठीत करा अशी मागणी करा. त्वरीत मदत आणि तात्काळ अधिवेशन बोलवायला हवे.
कुठं अडलं कळायला मार्ग नाही
अजित पवार म्हणाले, नेहमी जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन होत असते आता ऑगस्ट सुरु आहे. एक महिना झाला तरी यांना मुहुर्त मिळेना की, का कुठलं ग्रीन सिग्नल मिळेना का त्यांच्यात एकवाक्यता होईना काय कशाला घाबरत आहेत शिंदे फडणवीस हे कळायला मार्ग नाही पण राज्याची तेरा कोटी जनता आशेने पाहत आहेत.
याला कोण जबाबदार?
अजित पवार म्हणाले, मी नागरीकांना भेटलो तर त्यांचे अनेक प्रश्न आहेत. ते त्या-त्या खात्यातील मंत्र्यांना सांगण्याची गरज आहे. आम्ही सचिवांना प्रश्न सांगितले ते म्हणतात की, मंत्र्यांच्या शेऱ्याची गरज आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी हे लक्षात घ्यावे पण ते लक्षात घेत नसतील तर जनतेनेच हे पाहावे कोण याला जबाबदार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.