आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना-राऊत वाद:कंगना रनोटने महाराष्ट्राची माफी मागितली, तर मी तिची माफी मागण्याचा विचार करेल, संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट आणि शिवसेने मधील वाद अद्यापही सुरू आहे. हा वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. कंगना रनोटने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी केली आणि हा वाद सुरू झाला. हा मुंबईचा अपमान असल्याचं म्हणत शिवसेनेने कठोर भूमिका घेतली. यानंतर कंगनाने माघार न घेता शिवसेनेला सडेतोड उत्तर दिले. यामुळे हा वाद जास्तच पेटला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक कंगनाच्या विरोधात एकवटले. कंगनाविरोधात आंदोलने करण्यात आले. तिच्या पोस्टरला जोडेमारो आंदोलन करण्यात आले. सोशल मीडियायवरही तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. यानंतर आता संजय राऊतांनी कंगनाविषयी भाष्य केलं आहे.

राऊत म्हणाले की, कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर मी माफी मागण्याविषयी विचार करेल, तिने मुंबईचा उल्लेख मिनी पाकिस्तान केला आहे. तिच्यात हिंमत असेल तर जे मुंबईबद्दल बोलली तेच अहमदाबादविषयी बोलू शकेल का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.

राऊत का मागणार माफी?
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना रणौतवर 'हरामखोर मुलगी' म्हणत टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर अनेकांकडून आक्षेप नोंदवण्यात आला. राऊतांनी कंगनाची माफी मागावी अशी अनेकांकडून मागणी होत आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, त्यावर जर कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर मी तिची माफी मागण्याचा विचार करेन.

काय म्हणाली होती कंगना ?
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका कंगनाने ट्विटरवरुन केली होती. तिने ट्विट करत लिहिले होते की, ' आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?'