आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मागणी:लोकांची काळजी आणि दक्षता रेस्टॉरंट,जीम, क्लास चालक घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास काही हरकत नाही, आमदार रोहित पवारांची मागणी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनेही ही मागणी केली होती.

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. दरम्यान रेस्टॉरंट आणि जीम अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही. जीम आणि रेस्टॉरंट पुन्हा सुरू करण्यात यावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनेही ही मागणी केली होती. तर राष्ट्रवादीच्या खासदास सुप्रिया सुळेंनीही ही मागणी केली होती. आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी राज्यातील जीम, रेस्टॉरंट आणि क्लासेस सुरू करण्याची मागणी केली आहे.

जिम, रेस्टॉरंट आणि क्लास चालक योग्य काळजी आणि दक्षता घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास काय हरकत आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे. रोहित पवारांनी ट्विट करत विचारला आहे. लॉकडाउन लावण्यात आले तेव्हा सर्व काही बंद करण्यात आलेले होते. मात्र आता अनलॉक सुरू झाले आहे. तरीही रेस्टॉरंट आणि जीम सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

हे सर्व पुन्हा सुरू करण्याची मागणी करत रोहित पवारांनी ट्विट केले की, 'कोरोनाबाबत सरकार सर्व प्रयत्न करत असतानाही काहीजण नियमांकडं दुर्लक्ष करतात.पण लोकांची काळजी घेण्याची दक्षता रेस्टॉरंट/जीम/क्लास चालक घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास हरकत नाही,असं माझं व्यक्तिगत मत आहे.याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा,ही विनंती व घेतला जाईल असा विश्वास आहे.' असं रोहित पवार म्हणाले आहेत.