आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक निकालावर भुजबळांचे भाष्य:संजय राऊत काठावर वाचले नाही तर उलटच झाले असते, ते निवडून आले हे नशीब!

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेच्या चार जागा जिंकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणारे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या संदर्भात महाविकास आघाडीतीलच मंत्री छगन भुजबळ यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. संजय राऊत काठावर वाचले नाही तर उलटच झाले असते संजय पवार निवडून आले असते आणि संजय राऊत मागे राहीले असते ते निवडून आले हे आमचे नशीब अशा शब्दात त्यांनी चौथ्या जागेसंदर्भात पराभवाचे विश्लेषण केले.

राज्यसभा निवडणूकीचा बिगूल वाजल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी महत्वाची भूमिका निभावली. त्यांच्या आत्मविश्वासामुळे आता महाविकास आघाडीचा चौैथा उमेदवार निवडून येणारच असे काहीसे वातावरण निर्माण झाले होते पण भाजपच्या धुरंदरासमोर महाविकास आघाडीला एक पाऊल मागे घ्यावे लागले. एका जागेवर पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही आता स्पष्टपणे कबुली देण्यास सुरुवात केली असून छगन भूजबळांनीही आता यावर वक्तव्यही केले आहे.

काय म्हणाले भुजबळ?

​​​​​​भुजबळ म्हणाले की, ​संजय राऊत काठावर वाचले! नाही तर.. उलटच झाले असते; संजय पवार निवडून आले असते आणि संजय राऊत मागे राहीले असते..पण राऊत निवडून आले हे आमचे नशीब.

चूक कुठे झाली हे नेतेच ठरवतील

सर्व आमदारांची स्वतंत्र मिटींग झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षण आणि सल्ला दिल्यानंतरही मतदानावेळी काही आमदारांनी गडबड केली या प्रश्नावर भूजबळ म्हणाले, आम्ही आमच्या लोकांना सर्व गोष्टी समजावून सांगितल्या होत्या. मी स्वतः मिटींगमध्ये अहमद पटेल यांचे उदाहरण त्यावेळी दिले होते. आपल्या प्रतिनिधीला आपले मत दाखवायचे पण दुसऱ्यांना दिसता कामा नये. अपक्षांनी कुठलेही मत दुसऱ्यांना दाखवायचे नाही. कागदावर कुठल्याही प्रकारचे टींब, रेष असे काहीही असता कामा नये हे आम्ही सर्व आमदारांना समजावून सांगितले होते. महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी या गोष्टी आमदारांना सांगितल्या होत्या पण या चूका कशा झाल्या कुठे झाल्या हे त्यांचे नेते ठरवतील असेही भूजबळ म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...