आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण:शरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले तर आमच्यासाठी आनंदाची बाब, संजय राऊत यांची प्रतिक्रिया

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, पण..., संजय राऊत यांचा काँग्रेसला सल्ला

यूपीएच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवड होणार असल्याची राजकीय चर्चा रंगली आहे. या चर्चेवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. 'शरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले तर आम्हाला आनंदच आहे,' असे राऊत म्हणाले. तसेच यूपीएचे मजबूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे असेही राऊत म्हणाले.

संजय राऊत मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, जर शरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले तर आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पण या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत अजून कोणता प्रस्ताव आला नाही. त्यामुळे त्यावर बोलणे चुकीचे असल्याचे संजय राऊत म्हणाले.

यावेळी संजय राऊत यांनी काँग्रेसला सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, "काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विरोधीपक्ष पदही मिळवता आले नाही, हेही सत्य आहे. सध्या राजकारणाच्या परिस्थितीत सर्व विरोधी पक्षांना मजबुतीचे निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे विरोधी पक्षांनी एकत्र येऊन यूपीएला मजबूत केले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser