आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी आंदोलन:संवेदना दाखवली असती तर दिल्लीची हिंसा टळली असती, शरद पवार यांचा मोदी सरकारला टोला

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीत शेतकरी गेल्या ६० दिवसांपासून आंदोलन करत आहेत. सरकारने या माेर्चाची दखल घेतली नाही. जर सरकारने शेतकऱ्यांप्रति संवेदना दाखवली असती तर मंगळवारी प्रजासत्ताकदिनी राजधानीत घडलेली हिंसा टळली असती, या शब्दांत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी फटकारले.

कृषितज्ज्ञ व भारतीय हरितक्रांतीला चालना देणारे अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात पवार बोलत होते.

आज अण्णासाहेब शिंदे कृषिमंत्री असते तर शेतकऱ्यांना दिल्लीत ६० दिवस थंडीत आंदोलन करावे लागले नसते. कारण त्यांना शेती आणि शेतकऱ्यांप्रति संवेदना होती. आजच्या सरकारला ती बिल्कुलच नाही, तशी संवेदना असती तर काल दिल्लीत जो हिंसाचार उफाळला तो झालाच नसता. तसेच काही लोकांना या आंदोलनाचा गैरफायदा उपटता आला नसता, अशी पुष्टी पवार यांनी जोडली. आपण काल दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचे समर्थन अजिबात करत नाही. दिल्लीत जे घडले ते शोभादायक नाही. पण हे शेतकरी गेले ६० दिवस शांततेत आंदोलन करत होते. मग या आंदोलनाची दखल केंद्र सरकारने का घेतली नाही, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

मी केंद्रात कृषिमंत्री होतो. पण, कधीच एककल्ली निर्णय घेतले नाहीत. आम्ही कृषी कायदे जरूर केले. पण, राज्याच्या कृषिमंत्र्यांशी आम्ही सातत्याने बोलायचो, असे सांगत मोदी सरकारने केलेले तीन कृषी कायदे संसदेत चर्चा न करता मंजूर केले, असे पवार यांनी सांगितले. साखर प्रश्नावर पवार म्हणाले, यापुढे केवळ साखर कारखाने एके कारखाने असे चालणार नाही. आज गरजेपेक् षाअधिक साखर उत्पादित केली जात आहे. देशात व राज्यात साखरेचे साठे पडून आहेत. साखरेचे दर कोसळले आहेत. त्यामुळे इथेनाॅल निर्मितीला प्राेत्साहन दिले पाहिजे. तसेच उसापासून सीएनजी तयार केला पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...