आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आयपीएलचे यंदाचे सत्र कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित आहे. टी-२० विश्वचषक न झाल्यास बीसीसीआय ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएलचे आयोजन करू शकते. टी-२० लीग न झाल्यास चर्मकारापासून ते चिअरलीडर्स आणि स्कोअरर ते अम्पायरपर्यंत सर्वांवर परिणाम होईल. मंडळाला ४ हजार कोटी रुपयांचा फटका बसेल. लीगमध्ये सहभागी होणाऱ्या लाेकांना झळ बसेल. लीगसोबत जोडलेल्यांचे म्हणणे अशाच प्रकारचे आहे.
भास्करन सुपरकिंग्जसाेबत २००८ पासून करारबद्ध
आर. भास्करन चेन्नई सुपर किंग्जचा अधिकृत चर्मकार आहे. तो २००८ पासून फ्रँचायझी सोबत जोडलेला आहे. चेन्नईमध्ये १९९३ पासून होत असलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांचा साक्षीदार असून चिदंबरम स्टेडियमच्या बाहेर त्याचे दुकान आहे. तो दररोज ३०० ते ५०० रुपये कमावतो. सामन्यादरम्यान खेळाडूंचे ग्लोव्हज, पॅड व बूट दुरुस्तीसाठी अधिकृत जागेच्या बाहेर बसताे.
चिअरलीडर सोफिया सुपर मार्केटमध्ये काम करतेय
मुंबई इंडियन्सची चिअरलीडर सोफिया म्हणते, लीग न झाल्याने तिला खूप अडचणींचा सामना करावा लागतोय. ती ऑनलाइन नृत्य वर्गासह सुपर मार्केटमध्ये रात्रपाळीत काम करतेय. हैदराबादची एक चिअरलीडर चोई ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग नेटवर्किंग साइटसोबत काम करत आहे.
१५ पेक्षा अधिक अनकॅप्ड खेळाडूंना २० लाख
बंगालचा डावखुरा फिरकीपटू शाहबाज अहमदला बंगळुरूने २० लाखांत खरेदी केले. घरच्या स्पर्धेत शाहबाजने फलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. लिलावात १५ पेक्षा अधिक अनकॅप्ड खेळाडूंना स्थान मिळाले. अशात लीग न झाल्यास त्यांना पैसे मिळणार नाहीत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.