आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंनीच गद्दारी केली:बाळासाहेब ठाकरे असते तर ते मुख्यमंत्री झालेच नसते, उद्धव पदाला लायकही नाही- नारायण राणेंची टीका

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

"बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. उद्धव ठाकरे असतानाही बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री केले होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी लायक व्यक्ती नव्हती. त्यांना महाराष्ट्राच्या जनतेची काही माहिती नाही. त्यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली आणि भाजपासोबत युती करून मोदींच्या नावावर मते मागितली आणि काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत केवळ मुख्यमंत्री पदासाठी गेला गद्दारी केली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी गद्दारी केली" असा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज उद्धव ठाकरेंवर केली.

शिवसेनेचा अस्त जवळ आला

राणे म्हणाले, शिवसेना आता अस्तित्वात आहे का उरले सुरले आमदारही लवकरच शिंदे गटात जातील. शिंदे गट बरेचशे धक्के शिवसेनेला देत आहे. त्यामुळे काळजी एवढीच आहे, उद्धव ठाकरे हे त्यांची शिवसेना किती सांभाळू शकेल हा प्रश्न आहे. शिवसेनेचा अस्त जवळ आला आहे.

दुजोरा दिल्यास कोर्ट-कचेऱ्या सुरू होतील

100 खोके मातोश्रीला जात होते, यावर नारायण राणे म्हणाले की, मला याची कल्पना नाही पण मी दुजोरा दिल्यानंतर कोर्ट कचेऱ्या सुरू होऊ शकतात. त्यामुळे ज्यांना माहित असेल म्हणूनच त्यांनी आरोप केला.

शुभ बोला

नारायण राणे म्हणाले, ठाकरेंनी हिंदुत्वाशी गद्दारी केली आणि भाजपसोबत युती करून मोदींच्या नावावर मते मागितली आणि काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत केवळ मुख्यमंत्री पदासाठी गेला गद्दारी केली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी गद्दारी केली. राज्य सरकार दीड महिन्यात पडेल म्हणता पण शुभ बोला.

पितळ उघडे पडेल

नारायण राणे म्हणाले, दसऱ्याला शिवसेनेचे पितळ उघडे पडेल. शिवसेना आता अस्तित्वात नाही. उरलेले आमदारी लवकरच सोडून शिंदे गटात जातील. उद्धव ठाकरेंची स्मरणशक्ती कमी झाली. हे त्यांच्या अजूनही लक्षात येत नाही. त्यामुळे कॅसेट शिंदे पाठवत आहे आणि मातोश्रीवाले ते पाहतील की नाही ते माहित नाही.

बातम्या आणखी आहेत...