आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोगावलेंचे अंबादास दानवेंना प्रत्यूत्तर:आम्हाला ताटाखालचे मांजर म्हणता तुमचा मेळावा शरद पवारांच्या ताटाखालचा म्हणावा का?

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात दसरा मेळाव्याआधीच मोठे रणकंदण झाले आता त्यावरुनच टीका टिप्पणी सुरू झाली. अमित शहा यांच्या ताटाखालचे मांजर आम्हाला म्हणत आहेत, ठाकरे गटाला आम्ही शरद पवार यांच्या ताटाखालील मांजर म्हणायचे का? अशी टीका शिंदे गटाचे प्रतोद आणि उपनेते भरत गोगावले यांनी करीत शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना प्रत्युत्तर दिले. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

स्टेजवर बाळासाहेबांची खूर्ची ठेवणार

गोगावले म्हणाले, जे आम्हाला मोदी - अमित शहा यांच्या ताटाखालचे मांजर म्हणत आहेत, त्यांना आम्ही शरद पवार यांच्या ताटाखालील मांजर म्हणायचे का? आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची स्टेजवर ठेवून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पोहोचवणार आहोत.

जिवंत माणसाची खूर्ची ठेवत नाही

मुंबईत नुकत्याच झालेल्या एका मेळाव्यात संजय राऊत यांची खूर्ची शिवसेनेने रिकामी ठेवली होती. सध्या संजय राऊत कारागृहात आहेत. त्यावरुन गोगावले यांनी टीका केली. ते म्हणाले, आम्ही जिवंत माणसांच्या खुर्च्या रिकाम्या ठेवत नाही. कारण ती माणसं कुठेतरी बसलेलीच असतात.

काय म्हणाले होते दानवे?

विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाच्या मेळाव्यावर प्रखर टीका केली होती. म्हणजे मोदी - शहांच्या ताटाखालचे मांजर आहेत, टीका केली होती.

ठाकरे गटासह शिंदे गटाचा आज मुंबईत मेळावा होत आहे. या मेळाव्याला राज्यभरातून असंख्य शिवसैनिक आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते मुंबईत पोहचले आहेत. शिंदे गटाच्या मेळाव्याची पूर्वतयारी आणि नियोजन गोगावले हेही करीत आहेत. त्यांनी संजय राऊतांसह अंबादास दानवेंवरही आज सडकून टीका केली.

बातम्या आणखी आहेत...