आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आव्हान:हिंमत असेल तर निवडणुका एकत्र घ्या;  आदित्य यांचे आव्हान

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी महापालिका आणि विधानसभेची निवडणूक एकत्र घ्यावी, असे आव्हान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी शिंदे-फडणवीस सरकारला दिले. नवीन वर्षात तरी या गद्दार सरकारने ४० गद्दार आमदारांच्या आणि १३ खासदारांच्या जागी निवडणुका घेण्याची हिंमत दाखवावी, असेही ठाकरे म्हणाले.

अंधेरी पूर्व येथील गुंदवली शाळेतील ज्युनियर-सिनियर केजीच्या नुतनीकरण झालेल्या वर्गाचे उद्घाटन आज आदित्य ठाकरे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आदित्य यांनी शिंदे-फडणवीस सरकारला राज्यात निवडणुका घेण्याचे खुले आव्हान दिले. महापालिकेच्या निवडणुका घ्या तसेच विधानसभेच्या निवडणुका एकत्र घ्या. पण यांच्यात निवडणुका घेण्याची हिंमत नाही, असे ठाकरे यांनी सांगितले. ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. बेकायदेशीर मुख्यमंत्री स्वतःच्या कामासाठी दिल्लीत जातात, गुवाहाटीला जातात. पण राज्यासाठी कधी ते गेले नाहीत, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.

बातम्या आणखी आहेत...