आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

स्तुतिसुमने:नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व पाहिले तर त्यात स्वामी विवेकानंदांची झलक दिसते : फडणवीस

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे सज्जन व्यक्ती, मात्र, सरकारवर त्यांचे कसलेही नियंत्रण नव्हते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र भाजपने व्हर्च्युअल रॅली आयोजित केली. त्याला संबोधित करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना थेट स्वामी विवेकानंद यांच्याशी केली.

ते म्हणाले, स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन माेदींनी स्वयंसेवकत्व पत्करले व देशसेवा सुरू केली. नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व पाहिले तर त्यात स्वामी विवेकानंदांची झलक दिसते. विवेकानंदांप्रमाणेच योद्धा संन्यासी होऊन मोदीजी आयुष्य जगत आहेत.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात देश रसातळाला

फडणवीस म्हणाले, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे सज्जन व्यक्ती होते. मात्र, सरकारवर त्यांचे कसलेही नियंत्रण नव्हते. त्यांच्या काळात देश रसातळाला गेला. त्या राजवटीत प्रत्येक मंत्री स्वत:ला पंतप्रधान समजायचा. मात्र, खुद्द पंतप्रधान हे स्वत:ला पंतप्रधान समजत नव्हते.