आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेते, दिग्‍दर्शक कौशिक यांचे तत्त्वज्ञान:यशस्वी झालात तर मनावर ताबा ठेवा, हरलात तर बसू नका..

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, निर्माता सतीश कौशिक यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. कौशिक यांचे मित्र अभिनेते अनुपम खेर यांनी सांगितले की, सतीश दिल्लीत मित्राच्या घरी होते. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी चालकाला रुग्णालयात नेण्यास सांगितले. ते वाटेत असतानाच रात्री एकच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या वर्षी दैनिक भास्करसोबत बोलताना कौशिक यांनी आयुष्यातील चढ-उताराचे अनेक अनुभव सांगितले होते. ते म्हणाले होते की, तुम्ही यशस्वी झालात तर मनावर ताबा ठेवा आणि हरलात तर बसून राहू नका. कौशिक यांना मि. इंडियाद्वारे ओळख मिळाली होती. यात त्यांची कॅलेंडरची भूमिका होती. त्यांनी सुमारे ५० चित्रपटांत काम केले होते.

बातम्या आणखी आहेत...